*आमचा वाली कोण…?*
*कुही तालुक्यातील मोहाडी वासीयांचा सवाल.*
*थोडसही पाऊस आल्यास नाल्यांना पूर येऊन गावाचा इतर गावाशी संपर्क तुटते.*
कुही प्रतिनिधी गौरव बावणे
कुही(तितुर):- गेली कित्येक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था असलेल्या खलासना-कूचाडी-मोहाडी-तितुर मार्गाचे काम मागल्या वर्षी पूर्ण झाले पण याच मार्गावर असलेल्या त्या तीन पुलांचे काय असा सवाल तेथील स्थानिक लोक करत असून पावसाळ्यात अगदी अल्पसा पाऊस जरी पडला तरी तेथील नाले हे भरून येत रस्ता चक्क बंद होऊन जाते. पण मुख्य मुद्दा असा आहे की मोहाडी गावात प्रवेश करणाऱ्या दोन्ही मार्गावर नाले पडत असून अगदी लहान असे पूल त्यावर आहेत. त्यामुळे जर एखाद्या वेळेत पावसाळ्यात आपत्कालीन आरोग्य स्थिती निर्माण झाली तर काय ? असा सवाल उपस्थित करीत शासनाने पुलांची उंची वाढवावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.