*गुरू नानक जयंती साजरी*
सावनेर– अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये गुरू नानक जयंती साजरी करण्यात आली.स्कूल चे प्राचार्य राम कुमार शर्मा सर तसेच मुख्य अतिथी सुरजित सिंग यांनी गुरू नानक जयंती बद्दल विशेष माहिती दिली.त्यांची जीवन शैली,त्यांनी समाजाला दिलेल्या ज्ञान याबद्दल तसेच त्यांनी समाजाला दिलेल्या सर्वधर्म समभाव व सेवाधर्म सर्वोपरी आदी अनेक समाज कार्य बद्दल महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली.तर गुरू नानक देव यांचे चरित्र हे समाजाला सतत प्रेरणादायी ठरत असुन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालल्याने मानवाचे कल्याण होणे निश्चितच असते आपण सर्वांनी त्यांचे चरित्र वाचुन आपले जीवन सार्थक करावे असे आव्हान प्रा.राम शर्मा यांनी याप्रसंगी केले.
सदर आयोजनास वंदना यादव, वर्षा कावरे, ज्योती पारधी,स्मिता अटाळकर, सोनाली कोल्हे,मीना अजमेरा,अश्विनी दिवटे,कल्पना भेलोंडे, आरती धोटे, रंजिता घाटे,वंदना बारापात्रे ,समीर उईके आणि शिक्षक व शिक्षकेत्तर ह्या सर्वांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहयोग केला