*जिम संचालकाची निर्दयी हत्या*
*मंत्री केदार यांचा खाजगी अंगरक्षक “अंगद सिंग ” चा केला गेम*
*सत्तूर व्दारे डोक्यावर व मानेवर वार करुण रक्ताच्या थोळक्यात लोळवले*
*सावनेरः शहरात झपाट्याने वाढत असलेल्या जिम व्यवसायातील स्पर्धा व व्देश यातूनच मु्तक अंगद सिंग यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवीला जात आहे*
*मिळालेल्यख माहिती नूसार अंगद रविन्द्र सिंग वय (33) रा वाघोडा व नरेंद्र जयशंकर सींग (39) रा.शक्ती नगर वेकोली काँलोनी हे दोघेही मीत्र असुन अनेक वर्षापासून शहरात जिम संचालन व जिम ट्रेनर चे कार्य करत होते दोघात मैत्रीचे ही नाते अतुट होते*
*काही काळ आधी अंगद सिंग याने आपला वेगळा अत्याधुनिक सुविधायुक्त जिम सुरु केल्याने दोघांच्या मैत्रीत व्यवसायीक स्पर्धेची ठीनगी पडून वैरत्व वाढु लागले व आपसात खटके उडू लागले*
*दि.12 जानेवारीला सायंकाळी 8-30 च्या दरम्यान नागपूर रोड वरील नागोबा मंदिर परिसरात दोघात परत शब्दीक चकमक झाली व तोंडी वाद सुरु असतांनाच नरेंद्र सिंग याने काही कळण्या आधी जवळ असलेल्या सत्तूर अंगदसिंह च्या डोक्यात घालून त्याला रक्तबंबाळ केले अचानक झालेल्या प्राणघातक हल्यातून अंगद ने पळण्याचा प्रयत्न केला परंतू तो रस्त्यावर ठेवलेल्या मोटरसायल ला अडकून पडताच नरेंद्र ने परत अंगदसिंह वर सपासप वार करत त्यास तेथेच गतप्राण केल्याचे बोलल्यख जित आहे*
*घटनास्थळी असलेल्यांनी अंगद ला प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे प्राथमिक उपचारासाठी आणले असति अंगदच्या शरीरातून रक्त वाहूनगेल्याने पुढील उपचारासाठी त्यास एलेक्सेस हाँस्पिटल नागपूर येथे हलविण्यात आले तेथील डाँक्टरांनी तपसानी करुण अंगदला मु्त घोषीत केले*
*एकेकाळी चांगले मीत्र असणारे व्यवसायीक स्पर्धेच्या आहारी जाऊण वैरी बणले व यातूनच हा दुर्दैवी प्रकार घडला असे बोलले जात असुन अंगद सिंग हा क्षेत्राचे आमदार व मंत्री सुनिल केदार यांचा खाजगी अंगरक्षक असल्याचे बोलल्या जात आहे.*
*घटनेची माहीती मिळताच सावनेर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वात घटनास्थळी व प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे धाव घेऊण जमावात शांतता राखून पुढील तपास हुरू केला आहे शेवटचे वुत्त हाती येई पर्यंत गुन्ह्याची नोंद व आरोपीला अटक झाली नव्होती*