*रेल किसान स्पेशल ठरणार संत्रा उत्पादकासाठी संजीवनी-राजेंद्र हरणे* *नागपूरी संत्रा जाईल विदेशी बाजारात*

*रेल किसान स्पेशल ठरणार संत्रा उत्पादकासाठी संजीवनी-राजेंद्र हरणे*


*नागपूरी संत्रा जाईल विदेशी बाजारात*

नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

नागपुर / नरखेड़ – रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे प्रयत्न : 14 व 19 ऑक्टोंबरला किसान रेल स्पेशल.  संत्र्याचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेल्या नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल आता थेट रेल्वेद्वारे बांगलादेश व देशातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. रामटेकचे शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांच्या प्रयत्नातून किसान स्पेशल गाडी १४ व १९ ऑक्टोंबर रोजी धावणार आहे.

२० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापाकांसोबत झालेल्या बैठकीत खासदार श्री कृपाल तुमाने यांनी किसान रेल्वे चालवावी अशी मागणी केली होती. त्यावर कार्यवाही करीत रेल्वेने किसान रेल्वे गाडी चालविण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे नागपुरी संत्र्यासाठी १४ ऑक्टोंबरला देशांतगर्त किसान स्पेशल गाडी नागपुरी संत्र्याची वाहतूक करणार आहे. तर १९ ऑक्टोंबरला वरुड वरून ही गाडी बांगलादेश कडे कूच करणार आहे. बांगलादेश येथे जाणाऱ्या गाडीसाठी व्यापारी व संत्रा प्रोड्युसर शेतकरी कंपन्या शेतकऱ्यांचा मला खरेदी करून पाठविणार आहेत.

याशिवाय मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकावर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध होणार आहे, यामुळे प्रवाशी व शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आथिर्क तर खास चवीसाठी प्रसिध्द असलेली नागपुरी संत्री थेट शेतातून स्थानकावर पोहचतील यामुळे प्रवाशांना संत्र्याचा गोडवा वेळेत चाखात येणार आहे.

खासदार तुमाने यांनी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना कळमेश्वरसह काटोल, व नरखेड ,व मोवाड थांबा देण्याची मागणी केली आहे.

मोवाड रेल्वे स्थानकावर तिकीट विक्री ठेकेदारास २४ तास उपस्थित राहावे अशा सुचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय सर्व रेल्वे स्थानकावर विजेची व प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.

नरखेड रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध समस्या सोडविण्याच्या सूचना खासदार श्री तुमाने यांनी केल्या आहेत.

*रामटेकच्या प्रतिनिधीची मागणी प्राधान्यक्रमवार*
संत्रा उत्पादनात अव्वल असलेला नागपूर जिल्ह्यातील काटोल ,नरखेड, सावनेर, कळमेश्वर व हिंगना, तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी हे तालुके पूर्वी रामटेक मतदार संघात होते. यामुळे रामटेक मतदार संघ पूर्वीपासूनच संत्रा उत्पादनासाठी देशासह जगात प्रसिद्ध आहे. परिणामी रामटेकच्या खासदारांनी संत्रा निर्यातीसाठी व त्याच्या वाहतुकीसाठी केलेली मागणी प्राधान्यक्रमाने मानली जाते व त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाते.
राजेंद्र हरणे
शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर,ग्रामीण

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …