*आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त दंत चिकित्सक सावनेरकरांच्या सेवेत*
*जबड्याच्या शस्त्रक्रिया कमी दरात उपलब्ध*
*डॉ. अनुज जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि सूरज सेलकर
सावनेर – शहरातील व्यापारी विनोद जैन यांचे चिरंजीव डॉ. अनुज जैन हे तज्ञ दंत चिकित्सक असुन दंत चिकित्सा सेवा देत असताना जबडा फॅक्चर झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे अवघड आणि महागडे असल्याने गरीब रुग्णांना ते परवडणारे नव्हते. तसेच ही शस्त्रक्रिया अवघड आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही शस्त्रक्रिया सोपी व्हावी यासाठी सावनेर चे डॉक्टर अनुज जैन यांनी सखोल अभ्यास करुण सात नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे दुखापत झालेल्या व्यक्तीला वेदना कमी व लवकर बरे होण्याची इच्छा असते. अशावेळी शस्त्रक्रिया करताना नवनवे तंत्रज्ञान उपयोगी व सोपे पडते. मेंदूनंतर जबड्याची शस्त्रक्रिया ही कठीण मानले जाते. या शस्त्रक्रियेमुळे चेहरा विद्रुप होतो. परंतु आता जबडा फॅक्चरचा उपचार सोपा व रुग्णांना दिलासा देणारा झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. सावनेर येथील डॉ. अनुज जैन यांनी यावर अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासात्मक संशोधन व प्रयोग केले आहे.
डॉ. अनुज यांना समाजसेवेचा वारसा हा आनुवंशिक प्राप्त असुन त्यांचे आजोबा मानमलजी जैन तसेच वडील माजी नगरसेवक तसेच सावनेर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन यांचे चिरंजीव आहेत. सध्याचा सुशिक्षित युवक आपले ध्येय गाठण्यासाठी शहराच्या दिशेने धाव घेतात. ध्येय्य साध्य झाल्यानंतर त्यांना गावाचा विसर पडतो. मात्र, डॉ. अनुज यांनी आपले शिक्षण झाल्यानंतर रुग्णसेवेच्या ओढीने शहराकडे धाव न घेता आपल्या जन्मस्थानि सावनेर येथील मूळ गावी लोकांच्या सहवासात रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला.*
*नागरिकांच्या सेवेसाठी *” मॅक्सकेअर डेंटोफेसिअल क्लिनिक ” नुकतेच सुरू करून रुग्णसेवा सुरू केली आहे. सेवा देत असताना जबडा फॅक्चर झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करणे अवघड आणि महागडे असल्याने गरीब रुग्णांना ते परवडणारे नव्हते. तसेच ही शस्त्रक्रिया अवघड आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही शस्त्रक्रिया सोपी व्हावी यासाठी डॉक्टर अनुज जैन यांनी सात नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. त्यांनी हा शोध अवघ्या तीन वर्षांत लावला असून वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून त्यांच्या या संशोधनाला कॉफी राईट प्राप्त झाल्याचे डॉक्टर अनुज विनोद जैन सांगतात.
*ही टेक्निक जैन तंत्रज्ञान म्हणून ओळख*
डॉक्टर अनुज यांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे कॉपीराइट झाले असून त्यांचे हे तंत्रज्ञान आता जैन तंत्रज्ञान या नावाने ओळखले जाणार आहे. सर्वसाधारणपणे जबडा बांधण्यासाठी तारांचा उपयोग केला जातो. मात्र, डॉ. जैन यांच्या तंत्राज्ञानामुळे आता तारांचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्याच्या अवघड पद्धतीपासून सुटका मिळणार आहे. या उपचार पद्धतीचे अनेक फायदे आहेत. कमी वेळ व कुठलाही तोटा नाही. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणारा धोका कमी असतो. डॉक्टर जैन यांनी आतापर्यंत जवळपास 45 पुस्तके प्रकाशित केले असून त्या पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
डॉ.अनुज यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधून सावनेर शहराचा मान वाढविल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
*एमडीएस मध्ये मिळविले अनुज जैन नी सुवर्णपदक*
2020 मध्ये डॉ. अनुज यांना आयएडीएसच्या वतीने ओरल व मॅक्सीसलोफेशियल सर्जरीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. एमडीएसमध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी सेवा दिली आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय बोर्ड फेलोशिपमधून इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लाटिलांजीची फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. 2019 मध्ये चीन दौर्यात एओसीएमएफ मार्फत देण्यात आलेल्या फेलोशिपसाठी पेकिंग विद्यापीठात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.