*केदारला जामीन मिळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
*आतिषबाजी करुण केले उत्साहवर्धन*
मुख्य संपादक
सावनेर : नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन व शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
*आज साहेबांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते.उच्च न्यायालय नागपुर मुंबई खंडपीठाने 9 जानेवारी ला जामीन मंजूर करुण त्याच्या शिक्षेवर ही स्थीगीती दीली आहे*
*आपल्या लाडक्या नेत्याच्या जामीन व शिक्षेवर मा.उच्च न्यायालयाने बंदी उठवत जामीन मिळाल्याची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केला*
*9 जानेवारी रोजी मा उच्च न्यायालय नागपुर मुंबई खंडपीठ न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी आपला निर्णय देताना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे माजी मंत्री सुनील केदार यांनी जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्माचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी दिवाळी व नवीन वर्ष साजरे केल्याप्रमाणे शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.*
*सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी व जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच शेकडो कार्यकर्त्यांनी गांधी पुतला चौक गाठला, सुनील बाबू, आगे बढो, हम तुम्हारे साथ है, वारे शेर आगया शेर अशा घोषणा देत फटाके फोडले.*
*याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे, माजी नगरसेवक तेजसिंग सावजी, लक्ष्मीकांत दिवटे, सुनील चाफेकर, शफिक सय्यद, दीपक बसवार, युवा समाजसेवक मनोज बसवार, चंदू कामदार, अश्विन करोकर, प्रा योगेश पाटील, प्रा. सचिन मोहतकर स्वप्नील महाजन सौरभ साबळे, रोशन महंत, राहुल धोंगडे, आकाश कमाले, तुषार गायकवाड, संकेत गामे, मोहित बारस्कर, पंकज, रुपेश कमले, माँटी शर्मा, मनोज जामदार कैलास, अजय महाजन, रोहित भोसले, अजय डाखोळे आदी उपस्थित होते.*