Breaking News

*खापा येथील आरोग्य तपासणी शिबिरात 423 लाभान्वित* *आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे यशस्वी आयोजन* *गरजू रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मिळणार सुपरस्पेशालिस्ट उपचार सुविधा*

*खापा येथील आरोग्य तपासणी शिबिरात 423 लाभान्वित*

*आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे यशस्वी आयोजन*

*गरजू रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मिळणार सुपरस्पेशालिस्ट उपचार सुविधा*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर ः लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर आणि भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) च्या निमित्ताने 12 जानेवारीला सावनेर तालुक्यातील नगर परिषद कार्यालय, खापा येथे नि:शुल्क रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर आमदार डॉ आशिषराव देशमुख व खापा नघराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा 423 लोकांनी लाभ घेतला. तसेच मोठ्या प्रमाणात ऐच्छिक रक्तदान करण्यात आले.*

*लता मंगेशकर हॉस्पिटलच्या हृदयरोग, मूत्ररोग, मेंदूरोग ,कर्करोग, बाल शस्त्रक्रिया, मेडिसिन, नेत्ररोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्री व प्रसुती, कान-नाक-घसा, त्वचारोग व दंतरोग विभागाच्या विशेषज्ञांद्वारे रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. शिबिरात निःशुल्क ब्लड शुगर तपासणी आणि नि:शुल्क औषध वितरण देखील करण्यात आले.*

*गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे भरती करून आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नि:शुल्क उपचार व ऑपरेशन करण्याची तसेच योजनेत न बसणारे उपचार व ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्याची सोय आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी उपलब्ध करून दिली आहे. रुग्णांना हृदयरोग, हृदय शस्त्रक्रिया, मूत्ररोग, मेंदूरोग, मेंदू शस्त्रक्रिया, किडणी, कर्करोग, बाल शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी अशा अनेक सुपरस्पेशालिटी उपचार सेवा आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत,खापा नगरपरिषदेच्या अध्यक्षांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय चमूचे, सर्व नगरसेवक, नगरसेविका व नागरिकांचे आभार मानले.*

*लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ रवी बत्रा, डॉ प्रणव चरडे, डॉ सुधीर रावलानी, डॉ किरण कुलसुंगे, डॉ कांचन धांडे, डॉ अनुप्रिता भडागे, डॉ मृणाली वानखेडे आणि इतर विशेषज्ञांनी रुग्णांना सेवा प्रदान केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी खापाचे नगरसेवक, नगरसेविका, जितेंद्र मुळे, यांनी प्रयत्न केले.*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …