Breaking News

*मिताली चे सुयश*

*मिताली चे सुयश*

प्रतिनिधि – हितेश बनसोड
सावनेर ः दि.8 मे रोजु लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात शहरातील मिताली चिमुकलीने परिवाराची कठीण परिस्थिती ,पायाचा गंभीर आजार याऊपर वडिलांचे छत्र हरपले अश्या परिस्थीत वर मात करत कु. मिताली रामराव मोंढे हिने कोणतेही क्लासेस न लावता 89.40% गुण मिळवून जिद्दीचा नवा आदर्श निर्माण केला.

*अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सावनेर येथील कु. मिताली रामराव मोंढे हिने 89.40% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.*
*सन 2021 मध्ये नंदाजी बाबा येथील हेटी परिसरात तिच्या वडिलांचा डोहात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. आईने मिळेल ते काम करून घर सांभाळले, मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला आणि संसाराचा गाडा पुढे नेला.*
*मितालीला पायाचा गंभीर आजार असून, तिच्या उपचारासाठी आईने अनेक ठिकाणी धावपळ केली, अनेक प्रयत्न केले; अनेक उंबरठे झीजवले परंतु अपेक्षित यश आले नाही. तरीही आईने हार मानली नाही आणि मुलीच्या शिक्षणासोबत तिच्या उपचारासाठी सतत झटत आहे*
*याच कठीण परिस्थितीतही मितालीने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. शारीरिक वेदना, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी यांचा सामना करत तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित ठेवले.विशेष म्हणजे, इतक्या कठीण परिस्थितीतही तिने कोणतेही क्लासेस लावले नव्हते. स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर तिने हा यशाचा टप्पा गाठला.*


*डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि भविष्य घडवण्याची जिद्द घेऊन तिने अभ्यास सुरू ठेवला. तिच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे आजचे 89.40% गुण. ही फक्त तीला मिळालेल्या गुणांची गोष्ट नाही, तर एका मुलीच्या संघर्षाची, आईच्या त्यागाची आणि परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या स्वप्नांची कहाणी आहे.*
*तिच्या पुढील शिक्षणासाठी शासनाने तिला नक्कीच आर्थिक व शैक्षणिक मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी प्रशासनाकडे केली आहे*.
*कु. मिताली मोंढे हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …