Breaking News

*पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली भव्य विजयी मिरवणूक*

*पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले*

*शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली भव्य विजयी मिरवणूक*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः नुकत्याच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल सह इतर तीन राज्यात मिळालेल्या अभुतपुर्व विजयाचा सावनेर शहरात विजयोत्सव साजरा करण्यात आला.*


*दि.4 मे रोजी पश्चिम बंगाल, केरलम, तामिळनाडू, पांडूचरी व आसाम राज्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली व यात चार राज्यात भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नागपुर जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष रामराव मोवाडे, सावनेर नगर पालीकेच्या नगराध्यक्षा सौ.संजना ताई मंगळे,नगरपालिका सावनेर चे उपाध्यक्ष राजु घुगल,गटनेता रवींद्र ठाकूर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात भव्य विजयी जुलुस काढुन राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत एकमेकांना गुलाल लावत मीठाई वाटप करण्यात आली.याप्रसंगी मध्यप्रदेश च्या छपरा येथील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा सौ.निशा पटेल, माजी नगरसेवक तुषार उमाटे,नगर परिषद सावनेर चे बांधकाम सभापती आशिष मानकर,भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या रेखाताई पोटभरे, निखिल पोटभरे, सह भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा,भारतीय जनता पक्ष महिला आघाडी आदीचे सेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विजयी घोषणा दील्या*


*आयोजनाचे संचालन युवा मोर्च्याचे पिंटू सातपुते यांनी तर आभार बापू सुरे यांनी मानले*

Check Also

*44 करोड़ रुपये की न्यायालयीन बिल्डिंग का शिलान्यास संपन्न* *आम नागरिक और संविधान की मुख्य कड़ी – न्यायदान* अतुल चंदुरकर

🔊 Listen to this *44 करोड़ रुपये की न्यायालयीन बिल्डिंग का शिलान्यास संपन्न* *आम नागरिक …