*संडे आँन सायकल ला उत्सफुर्त प्रतिसाद*


मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक 7- 6 -2026 रोजी मा. सागर खर्डे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर ग्रामीण यांचे कार्यालयीन बिनतारी संदेश अन्वये सावनेर येथे संडे ऑन सायकल हा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम गांधी चौक, शिवाजी चौक, लीलाश्री लॉन, होळी चौक ,बाजार चौक, गडकरी चौक- पोलीस स्टेशन सावनेर पर्यंत घेण्यात आला.*


*सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी अंमलदार होमगार्ड गोतमारे गुरुकुल चे संचालक भाऊ गोतमारे व विद्यार्थी नागरिकांनी सहभाग नोंदवून संडे आँन सायकल हा उपक्रम यशस्वी केला*



*सदर आयोजनात सावनेर पोलीस स्टेशन चे निरिक्षक ऋतुजा जाधव यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आठवड्यातून एक दिवस सायकल चा वापर करुण पेट्रोल डीझल ची बचत करण्याचे आव्हान करत म्हटले की आपण प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी वाहनांचा वापर करतो त्यामुळे प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचे संतुलनात बिगाड होतो सोबतच रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे रस्ते अरुंद होत चालली आ एत सोबतच अपघाताची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या वाहनांना आराम देत सायकलचा वापर करावा जेणेकरून पेट्रोल व डिझेल ची बचत तर होईलच सोबतच पर्यावरण ही राखला जाईल असे आव्हान केले*
Maharashtra News Media सच की आवाज