Breaking News

*जिवघेन्या वाकी डोहाच्या कुंपणाकरिता 46 लक्ष निधी तत्काळ मंजूर* *सावनेर विधानसभा क्षेत्राचे कामगिरी दमदार आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या धडक प्रयत्नातून मिळाला तत्काळ निधी* *हितज्योती आधार फाऊंडेशन ने केली होती मागणी*

*जिवघेन्या वाकी डोहाच्या कुंपणाकरिता 46 लक्ष निधी तत्काळ मंजूर*

*सावनेर विधानसभा क्षेत्राचे कामगिरी दमदार आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या धडक प्रयत्नातून मिळाला तत्काळ निधी*

*हितज्योती आधार फाऊंडेशन ने केली होती मागणी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध ताजुद्दीन बाबा वाकी दरगाह जवळून वाहत असलेल्या कन्हान नदिच्या डोहात बुडून पर्याप्त सुरक्षा आणि सुविधा नसल्याने दरवर्षी अनेकांचा नाहक मु्त्यू होत होता. सदर अप्रीय घटना टाळण्यासाठी हितज्योती आधार फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, समाजसेवी भुषण कुबडे,मदन डहाके,निखिल पोटभरे आदिंनी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार लोकनेते जननायक मा.डॉ. आशिषबाबू देशमुख यांच्याशी व्यक्तिशः त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर विषयावर विस्तृत चर्चा करुण तातडीने उपाययोजना करणाकरिता लेखी निवेदन दिले होते.*


*सदर निवेदनावर लगेच साकारात्मक विचार करुण आमदार डॉ आशिष देशमुख तहसीलदार सावनेर, उपविभागीय अधिकारी सावनेर विभाग, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सावनेर तसेच नागपुर यांच्याशी वेळीच संपर्क साधून घटनास्थळ पंचनामा व तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांची माहिती संकलित करण्याच्या सुचना देण्यात आल्या.त्या अनुषंगाने सावनेर तहसीलदार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी दोन दा घटनास्थळी भेट देऊन सदर ठीकाणी प्रथम चरणी काटेरी तारांचे कुंपन,बँरीकेटींग, धोक्याचे स्थळ, जिवघेणा डोह आदीचे फलक,सुरक्षा कँमेरे लावने व सुरक्षा रक्षक नेमुन कन्हान नदिच्या सदर डोहाकडे जाणाऱ्यांना रोखण्याकरीता कडेकोट बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची माहिती क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांना देण्यात आली असता त्यांनी वरिल उपाययोजना करण्यासाठी लागणार्या निधीचा आराखडा तातडीने तयार करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दील्या होत्या*


*त्याअनुषंगाने पाटबंधारे प्रकल्प विभाग नागपुर द्वारे 46 लक्ष 40 हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करुण मा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केला असता मा.आमदार आशिषबाबू देशमुख याऔनी मा.जिल्हाधिकारी यांच्याशी वेळोवेळी संवाद साधुन कन्हान नदीच्या सदर वाकी डोहात सातत्याने होत असलेल्या जिवीतहानी थांबवीने अंत्यंत गरजेचे असल्याचे निदर्शनास आनुन देत दि.29 मे 2026 रोजी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सभा सन 2026-27 नाविन्यपूर्ण (लेखाशीर्ष) अंतर्गत सदर कार्यांस मान्यता प्रदान करुण 46 लक्ष 40 हजार रुपयाचा निधी मंजूर करुण त्यातील पहिला टप्पा 20 लक्ष रुपये वितरित करण्यात आले*

*आमदार आशिष देशमुख यांच्या प्रयत्नाला यश*

*क्षेत्राचे आमदार जननेते डॉ. आशिषबाबू देशमुख यांना हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, समाजसेवी भुषण कुबडे यांच्या नेतृत्वाखाली 2 मे 2026 रोजी निवेदन सादर करुण सदर जिवघेणा डोह बुजवण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार डॉ आशिषबाबू यांनी वेळीच दखल घेत पाटबंधारे विभाग सावनेर यांना घटनास्थळी पोहचुन वस्तुस्थितीची जाणीव करण्याच्या सुचना दील्या असता पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व त्यांच्या सहकार्यांनी त्याच दिवशी घटनास्थळी भेट दीली व आमदार साहेबांसोबतच आपल्या वरिष्ठांना ही सदर माहीती प्रदान केली असता दि.5 मे 2026 रोजी सावनेर तहसील चे तहसीलदार अक्षय पोयाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमहे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सोबत घेत सदर डोहाची पाहणी व उपाययोजना करूण लगेच आराखडा तयार करुण शासन दरबारी मंजुरी करीता पाठवला अवघ्या एक आठवड्यात सर्व कागदोपत्री कारवाई व मात्र तीन आठवड्यात सदर प्रकल्पाला मंजुरी मिळवून देत.सदर ठिकाणी पोहण्याच्या निदात अश्या प्रकारे होत असलेल्या मु्त्यूची मालीका रोखण्यासाठी टोकाचे प्रयत्न करणारा एक खरा जनतेचा सेवक म्हणून डॉ. आशिषबाबू देशमुख यांचे कौतुक होत आहे.आज जरी सरद परिसरात काटेरी कुंपण, बँरीकेटींग व इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तर भविष्यात सदर जिवघेणा डोह पुर्णपणे बुझवीन्याकरिता ही आमदार आशिषबाबू देशमुख पुर्ण प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे*


*तर सामान्य जनतेच्या जीवणाशी निगडित असलेल्या प्रश्नावर फक्त चार आठवड्यात निकाली काढत निधी उपलब्ध करुण दिल्याबद्दल ज्यांचे “कामगिरी दमदार” असे बिद वाक्य असलेले क्षेत्राचे आमदार डॉ.आशिषबाबू देशमुख यांचे सोबतच सदर बातम्या आपल्या प्रसिद्ध दैनिकात प्रखरतेने प्रकाशित करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड, व पदाधिकारी, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सोबतच समाजसेवी भुषण कुबडे, मदन डहाके,निखिल पोटभरे,विकेश सहारे सह सेवेकरी परिवारातर्फे आभार व्यक्त केल्या जात आहे*

Check Also

*पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली भव्य विजयी मिरवणूक*

🔊 Listen to this *पश्चिम बंगाल सह इतर राज्यात कमळ फुलले* *शहरात ढोलताशांच्या गजरात निघाली …