*कन्हान चा विद्यार्थी युक्रेन मधून सुखरूप परतला*
*शिवसेना पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धात हजारो भारतीय विध्यार्थी अडकले आहेत. त्यामधून काही विध्यार्थी मात्र भारतात सुखरूप परतले . त्यामधील मायदेशी परतलेल्या पैकी १ विध्यार्थी हा कन्हान-पिपरी निवासी कु योगेश गंगाधर ढोमणे हा आहे. कु. योगेश ढोमणे हा आपल्या घरी सुखरूप परतल्याची माहिती शिवसेना कन्हान शहर पदाधिकार्यांना मिळताच पदाधिकार्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्याचा निवास स्थानी जाऊन भेट दिली असता त्याचा सोबत युक्रेन मध्ये घडलेल्या प्रसंगाची माहिती घेतली आणि त्याचा भारतापर्यंतचा झालेला प्रवास तसेच त्याच्या परिवाराबद्दलची चौकशी करून त्यांना धेर्य दिले आणि योगेश ला भगवा दुपट्टा घालुन , मिठाई व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . या प्रसंगी नगरसेवक अनिल ठाकरे , शिवसेना शहर प्रमुख छोटू राणे , चिंटू वाकुडकर , अजय भोस्कर , हरीश तिडके , सोमनाथ राणे , श्रावण खंडाते , शुभम येलमुले , शैलेश चौरे सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .