Breaking News

*संजय गांधी निराधार योजना शिबीराचे आयोजन* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांचा उपक्रम*

*संजय गांधी निराधार योजना शिबीराचे आयोजन*

*नगराध्यक्षा संजना मंगळे यांचा उपक्रम*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले

सावनेर ः सावनेर नगरिच्या नवनियुक्त नगराध्यक्षा संजना मंगळे यांच्या संकल्पनेतून शहरातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन, इंदिरा गांधी वु्ध्दकपाळ निवृत्तीवेतन, संजय गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांचे मानधन बंद झाले आहे. किंवा ई-केवायसी प्रलंबित आहे.अथवा अन्य काही कारणांमुळे प्रलंबित आहे अथवा मिळत नाही.त्यांचे मानधन सुरळीत करण्यासाठी “संजय गांधी निराधार योजना” शिबिराचे भव्य आयोजन गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026 ला नगर परिषद सावनेर च्या सभागृहात सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 पर्यंत करण्यात आले आहे*


*सदर शिबीराचे उदघाटक मा.आर्शीया जुही मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर यांचे हस्ते राजुभाऊ घुगल उपाध्यक्ष नगर परिषद सावनेर, रविंद्र ठाकूर गटनेते नगर परिषद सावनेर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असुन ज्यांचे मानधन सुरळीत नाही त्यांनी शिबिरास येतांना आपले अद्यावत आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट फोटो सोबत आणावे असे आव्हान सावनेर नगरिच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे यांनी सावनेर शहरवासीयांना केले आहे*


*नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी शहरातील निराधारांच्या प्रलंबित मानधन मिळवून देण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …