Breaking News

*सावनेर तहसील कार्यालयातील म़डळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात* *25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले*

*सावनेर तहसील कार्यालयातील म़डळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात*


*25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले*

सावनेर : सावनेर तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. सावनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मंडळ अधिकार्यांला पाटणसावंगी येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील फेरफार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 75 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 50 हजार रुपये यापूर्वी स्वीकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित 25 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई पाटणसावंगी येथील कार्यालयात करण्यात आली असून घटनेनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

*या घटनेमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. प्रवीण मेश्राम असे या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे*

Check Also

*कन्हान नदितील मृत्यूचा डोह बुझवा* *आमदार डॉ. आशिष देशमुख यांना निवेदन*

🔊 Listen to this *कन्हान नदितील मृत्यूचा डोह बुझवा* *आमदार डॉ. आशिष देशमुख यांना निवेदन* …