Breaking News

*वाचन प्रेरणा दिवस” व नशा मुक्त अभियान कार्यक्रम संपन्न* *गणेश वाचनालय सावनेर चे आयोजन*

*वाचन प्रेरणा दिवस” व नशा मुक्त अभियान कार्यक्रम संपन्न*

 

*गणेश वाचनालय सावनेर चे आयोजन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर:- आज 15 october 2026 रोजी भारताचे पूर्व राष्ट्रपति, भारतरत्न ए. पी जे अब्दुल कलाम यांची जन्म जयंती निमित्त श्री गणेश शिक्षण संस्था तर्फे गणेश वाचनालय नगर परिषद परिसर मध्ये “वाचन प्रेरणा” दिवस व तालुका विधि सेवा समिति यांचे संयुक्त विद्यमान “नशा मुक्त अभियान” कार्यक्रम एड. चंद्रशेखर बरेठिया, यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथि तसेच अध्यक्ष तालुका विधि सेवा समिति व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री एम. बी. मोहोड़, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.पी ठाकुर, प्रथम श्रेणी न्यायाधीश एन.वी. रणवीर मॅडम, दूसरे प्रथम श्रेणी न्यायधीश एस.एस गाळे मैडम यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

 

या प्रसंगी न्यायाधीश श्री एम.बी मोहड़ यानी वाचक विद्यार्थी यांना शिक्षण व वाचन याचे महत्व पटून दिले तर न्यायाधीश एन.वी.रणवीर यानी, मार्गदर्शन करतानी प्रतिबंधित अम्लीय पदार्थ यांचे सेवनाच्या लत मूळे समाजावर होत असलेले वाईट परिणाम व कायद्यातिल शिक्षा व तरतुदी बाबत जन जागृति केली, तसेच अध्यक्षीय भाषण मध्ये एड. चंद्रशेखर बरेठिया यानी मौलिक जवाबदारी बाबत मनोगत व्यक्त करतानी संविधान प्रमाणे प्राप्त मौलिक अधिकार जपुन ठेवण्याची जवाबदारी जेवळी.न्यालयाची आहे त्यापेक्षा मोठी जवाबदारी प्रत्येकि नागरिकावर असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे सचिव भूपेंद्र पूरे यानी तर आभार प्रर्दशन प्रशांत जामदार यानी केले कार्यक्रमात प्रमुख्याने तालुका वकील संघ अध्यक्ष शैलेश जैन ,अँड मनोज खंगारे पूर्व नगराध्यक्ष एड लोधी, पूर्व व्यापारी संघ अध्यक्ष विनोद जैन, रघुनन्दन जामदार,एड. श्रीकांत पांडे, शंकर ढोके, राजपुते गुरुजी, विद्यार्थी वाचक संगीता धवडे कर्मचारी वृंद नलगुंडवार, नितिन पूरे अजय अलघरे व इत्तर सामाजिक कार्यकर्ता व विद्यार्थी वाचक उपस्थित होते

Check Also

*समर्पण आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचा सन्मान* *डॉ. राजीव पोतदार यांच्यावर भाजपचा विश्वास* *शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल*

🔊 Listen to this *समर्पण आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचा सन्मान* *डॉ. राजीव पोतदार यांच्यावर भाजपचा …