Breaking News

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

*सावनेर शेगाव बस सुरु*

*नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः जननेता आमदार डॉ. आशिषराव देशमुख साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व पाठपुराव्याने सावनेर–परतवाडा मार्गे शेगाव नियमित पूर्वरत बससेवा आज पुन्हा सुरू झाली.आमदार आशिष देशमुख यांच्या अनुपस्थितीत सावनेर नगरीच्या प्रथम नागरिक नगर पालीकेच्या नगराध्यक्षा संजनाताई मंगळे,भारतीय जनता पक्षाचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे यांनी बसचे पूजन करून तसेच बस चालक व परिचालकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तर या बस मधे प्रथमच प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना मीठाई वाटप करण्यात आली.यावेळी आगार व्यवस्थापक, नगरसेवकगण , नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सावनेर शेगाव थेट बससेवा परिसरातील नागरिक व भाविकांसाठी निश्चितच लाभदायी ठरणार आहे.*


*सदर बस ही दररोज सकाळी 9-30 ला सावनेर वरुन काटोल,जलालखेडा, वरुड,मोर्शी, चांदुरबाजार,अचलपूर, परतवाडा, अंजनगाव सुर्जी,आकोट मार्गावरून शेगाव ला पोहचेल तर दररोज सकाळी 7-10 ला शेगांव वरुन सावनेर करीता रवाना होईल*

*श्रेय घेण्याची होड*
*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहान मंडळाच्या सावनेर आगारातील मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सावनेर शेगाव ही बस फेरी सुरू करण्यासाठी अनेकदा अनेकांनी आगार प्रमुखांशी संवाद साधून प्रयत्न केले.अथवा केलेही असतील परंतू सदर सावनेर शेगाव बस सुरू व्हावी याकरिता सावनेर नगरपालिकेच्या नघराध्यक्षा संजना मंगळे तसेच नगरसेविका व शीक्षण सभापती सोनाली उमाटे यांनी क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या निदर्शनात सदर बाब आणून देत वारंवार पाठपुरावा केल्याने व आमदार आशिष देशमुख यांच्या सतत प्रयत्नातून आखेर आज दि.11 मे 2026 रोजी सकाळी 9-30 ला सदर सावनेर शेगाव बस फलाटावर लागताच प्रवाश्यांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव दिसून आले.मात्र सावनेर शेगाव बस सुरू होणार असल्याची माहीती कळताच हि बस आम्ही सुरु केलीचा नाद करत सोशल मिडियावर पोस्टरबाजीला सुरवात झाली आहे.

*याप्रसंगी नगर परिषद सावनेर चे गटनेते रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष राजु घुगल, नगरसेवक निलेश पटे,महेश चकोले,मंदार मंगळे,राजेश गुप्ता,नगरसेविका सोनिलीताई उमाटे, सुचिताताई सुरे,पुर्व नगरसेवक तुषार उमाटे,भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याचे पींटू सातपुते सह आनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

Check Also

भारतीय जनता पक्षाचे सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.आशिषबाबू देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔊 Listen to this भारतीय जनता पक्षाचे सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांना …