*मतमोजणी करिता प्रशासन सज्ज*
*आठ टेबल पाच फेर्यात पार पडणार मतमोजणी*

सावनेर ः नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबर 2025 रोजी एकूण 39 मतदान केंद्रावर 11 प्रभागांकरिता एक नगराध्यक्ष व 23 नगरसेवक पदा करिता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता पासून होणार आहे . त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अक्षय पोयाम , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. अर्शिया जुही यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषद सावनेर, नगरभवन कार्यालय या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे. मत मोजणी करीता एकूण 8 टेबल ठेवण्यात आले आहे. मतमोजणी ही 5 फेऱ्यांमध्ये होणार आहे.*

*त्याकरिता एकूण 30 ते 35 अधिकारी/कर्मचारी उपस्थित असतील. प्रत्येक उमेदवारास एका बुथ करिता एक प्रतिनिधी ठेवण्याची मुभा असल्यामुळे त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराने मतमोजणी प्रतिनिधीचे ओळखपत्र तयार करून घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसोबत नगरपरिषद सावनेर या ठिकाणी भेट देऊन ओळखपत्र बनवून घ्यावे.* *ओळखपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही उमेदवार अथवा मतमोजणी प्रतिनिधीला उपस्थित राहता येणार नाही. मोजणीच्या वेळी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार नागरिकांनी मतमोजणीच्या कालावधीत शांतता व शिस्त राखून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अक्षय पोयाम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्शिया जुही, तसेच श्री उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.*

*निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम तसचे सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्शीया जुही यांनी मतमोजणी कक्ष व परिसरातील पाहणी केली असुन सर्व सुरक्षाव्यवस्था तसेच मतमोजणी परिसरात प्रवेशाबाबत दिशानिर्देश देण्यात आले*

*मिळणार नगरीला नवे प्रतिनिधी*
*जवळपास मागील चार वर्षापासून सुरु असलेली प्रशासकीय राजवट केव्हा शमते व जनतेनी निवडलेले जनप्रतिनिधी केव्हा आपल्या नगरीचा कारभार सांभाळतात याची उत्सुकता सर्वांना लागली असुन होणाऱ्या मतमोजणीतून नगरीला नवा नगराध्यक्ष व 23 नगरसेवक मिळणार आहे.याकरिता निवडणूक रिंगणात असलेले भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, नगरविकास आघाडी तसेच इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांचे भाग्य आज इव्हिएम मतपेटीतून उजळणार आहे*
Maharashtra News Media सच की आवाज