इश्क और जंग मे सब जायज… अमोल देशमुख
मुख्य संपादक-
सावनेर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे सर्व उमेदवार गावोगावी प्रचार करत असून मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.*
*नागपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाल्यास, सावनेर विधानसभा निवडणुकीची चर्चा जोरात सुरू असून, गेल्या तीन दशकांपासून राज्यात सत्ता गाजवणाऱ्या सुनील केदार यांच्या अभेद गडाला खिंडार पाडण्यासाठी भाजपसह सर्वच पक्ष निवडणूक प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांचे चिरंजीव आशिष देशमुख हे भाजप पक्षाकडून तर अमोल देशमुख हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही भावांमधील परस्पर संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आशिष देशमुख माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करत त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर स्वतःला कट्टर काँग्रेसी आणि काँग्रेस विचारधारेचे अनुयायी म्हणवून घेणारे अमोल देशमुख यांनीही प्रचाराला वेग दिला आहे. दिवसेंदिवस त्यांची वाढती लोकप्रियता आणि व्यापक जनसमर्थन त्यांचे मनोबल वाढवत आहे. अशा स्थितीत निवडणुकीची उत्सुकता वाढत आहे.*
*दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात*
*सावनेर विधानसभा निवडणुकीत सख्खे भाऊ आशिष देशमुख आणि अमोल देशमुख आमनेसामने असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिष देशमुख आपला विजय निश्चित मानून अभिमानाची भावना व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे अमोल देशमुख हे “इश्क और जंग मे सब कुछ जायज” असल्याचे सांगत कासव गतीने मतदारांमध्ये आपली ओळख निर्माण करत सावनेर विधानसभा निवडणूक जिंकून नवा इतिहास लिहिण्यास उत्सुक आहेत.*
*दोन भावांच्या या लढतीत कोणाचे किती नुकसान होणार हे येणारा काळ आणि मतदारच ठरवणार की ही निवडणूकीत काँग्रेसच्या सौ. अनुजाताई सुनील केदार विजीयी होणार की देशमुख बंधु आशिष की अमोल…*