*सर्वसाधारण आदिवासीक्षेत्रात कार्यरत शिक्षक, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करा* *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना सूचना*

*सर्वसाधारण आदिवासीक्षेत्रात कार्यरत शिक्षक, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करा*

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना सूचना*

वरोरा प्रतिनिधि मूजम्मिल शेख
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख आहे. अतिदुर्गम भागात देखील शिक्षक, कर्मचारी सेवा देत असतात. परंतु शासन निर्णय व न्यायालयाचा निर्णय असतांना देखील सर्वसाधारण आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी देण्यात यावा असा आहे. परंतु जिल्ह्यात त्याच पालन होत नसल्याची बाब अतिशय गंभीर असून त्वरित नियमाचे पालन करून शिक्षक, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करा अशा सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना दिल्या.

सामान्य प्रशासन विभागाने ६ ऑगस्ट २००२ रोजी आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यात आली नाही. त्यामुळे आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकस्तर वेतन श्रेणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चंद्रपूर शेजारील नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना अद्याप सदर शासन निर्णयाचा लाभ मिळत नाही. सर्व विषय तपासून त्वरित या संदर्भात निर्णय घेऊन संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना केल्यात.

त्यासोबतच वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पाणी योजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यामध्ये दुष्काळ क्षेत्रातील गावांना मुबलक पाणी मिळण्यासाठी योजना आखाव्यात, पाणी पुरवठ्याचे अर्धवट प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी गती द्यावी, बचत गटांकरिता स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, त्यासोबतच ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत योजनेचा लाभ मिळायला हवा अशा लोकहिताच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …