*रामटेक शहरात ऑटो रिक्षाचालक आणि पोलिस कोविड पाॅजिटीव्ह*
रामटेक तालूका प्रतिनिधी ललित कनोजे
रामटेक– 22 जुलै रोजी नगरपरिषदेच्या वतीने सतत सर्वेक्षण करण्यात आले आणि पोलिस विभागातील कर्मचारी आणि वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यात सुभाष वॉर्ड येथिल अाॅटो चालक आणि रामटेक पोलिस स्टेशन एएसअाय पोझिटिव्ह असल्याचे आढळले. दोघांनाही नागपुरात रेफर केले. ऑटो चालकाच्या संर्पकांतील 6 लोकांना कीट्स जवळील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले. आणि काही 22 लोकांना होम कोरोनाटीन केले गेले अाहे. कोविड रुग्ण अाढळल्याने हा परिसर प्रतिबंधीत म्हणून घोषित करण्यात आला. अशी माहिती नगर परिषद सीओ स्वरूप खारगे यांनी दिली. रामटेक तहसीलमध्ये एकूण कोरोना पाॅजिटीव्ह संख्या 14 झाली आहे. एसडीओ जोगेंद्र कातारे, तहसिलदार बाळासाहेब मस्के आणि सीओ स्वरूप खारगे यांनी लोकांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत कोविड चाचण्या घेण्याचे आवाहन केले आहे.