*सावनेरात परत दोघांना कोरोनाची लागन*
*आज सावनेर शहरासह तालुक्यातील लोकांच्या 83 आरटीपीसीआर तपासणी*
*कालच्या तपासणी तील एक साई नगर सावनेर तर दुसरा सदभावना येथील रुग्णांना कोरोना विषाणूंची लागन*
*वेकोली पाटनसावंगी कामगारासह नगर पालिका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पाँजेटिव्ह*
*सद्यापरिस्थीत शहरात एकुण 16 एक्टिव्ह रुग्ण तर 42 हायरिस्क*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः सावनेर नगर प्रशासन व प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर व्दारे दि.23जुलै ला करण्यात आलेल्या 83 नागरिकांच्या आरटीपीसीआर या (स्वँब) कोवीड़19 तपासणीतून दोन रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निश्पन्नास आल्याची माहीती नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़19 चे प्रबंधक डॉ भुषण सेंबेकर, डॉ.संदीप गुजर तसेच नगर पालिका सावनेर चे कोवीड़ 19 तपासणी विभागाचे प्रमुख अतुल गावंडे,नितीन चाचरकर व जयंत वानखडे यांनी दिली*
*मिळालेल्या माहितीनुसार साई नगर येथील निवासी व नगर पालिकेचे कर्मचारी व सदभावना नगर पाटनसावंगी वेकोली वसाहतीतील एक कामगार यांचा अहवाल पाँजेटिव्ह असुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केन्द्र या अस्थाई स्वरुपाच्या विलगीकरण केन्द्रात 42 लोकांना हायरिस्क मधे ठेवण्यात आले आहे*
*सावनेर शहरात मागील काही दिवसापासून सतत कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांचा सातत्याने वाढत असल्याने दि.22 ला झालेल्या 100 नागरिकांच्या अँन्टीजेन टेस्ट मधे एकही रुग्ण आढळून न आल्याचे कालचा दिवस निरंक म्हणजेच शुन्य रुग्ण असा शहरवासीयांना दिलासा देणारा ठरला परंतु यातील काही संशयास्पद नागरिकांचे आरटीपीसीआर टेस्ट ची रिपोर्ट आज प्राप्त झाली असून त्यातील नगर पालिका सावनेर चा कर्मचारी पाँजेटिव्ह निघाल्याने परत शहरवासीयांन मधे धडकी भरली असुनही मात्र रस्त्यावरील गर्दी मात्र कमी होतांना दिसत नसल्याने चिंतेचे वातावरण ओढावले आहे*
*अँन्टीजेन टेस्टींग बद्दल गैर समज करुन घेऊ नये*
*कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सद्यस्थितीत शासनस्तरावर आरटीपीसीआर व अँन्टीजेन अश्या दोन तपासण्या केल्या जात आहेत त्यात अँन्टीजेन टेस्टींग चा रिपोर्ट तात्काळ म्हणजेच वेळीच उपलब्ध होतो तर आरटीपीसीआर चा रिपोर्ट कीमान 24 तासात उपलब्ध होतो व दोन्ही पैकी कोणत्याही तपासणीतून जो रुग्ण पाँजेटिव्ह अढळला त्यास नागपूर रवाना करुण त्यावर पुढील उपचार करण्यात येते.परंतू काही ठीकणी अश्या अफवा पसरत आहे की अँन्टीजेन तपासणीत पाँजेटिव्ह आलेला रुग्ण पुढील आरटीपीसीआर तपासणीत निगेटिव्ह आला तसे होत नाही प्रत्येक तपासणीच्या वेळा ठरवून दिलेल्या ठारावीक वेळीच करण्यात येतात व जो रुग्ण पाँजेटिव्ह आढळला त्यास 14 दिवस नागपूर येथील मेओ व मेडिकल हाँस्पिटल नागपूर तसेच नागपूर शहरातील इतर कोवीड़ कोरंटाईन सेंटर मधे ठेवण्यात येते.करिता नागरिकांनी कोणत्याही अफवांवर लक्ष न देता आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आव्हान स्थानिक कोवीड़ 19 चे प्रबंधक विभागाव्दारे करण्यात येत आहे*
*घरीच रहा,गर्दीचे ठीकणे टाळा,मास्क व सेनिटाईझर चा वापर करा स्वतः व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या*