*वन्यजीव शिकार्याविरुद्ध वन विभागाची कारवाई*
*दोन आरोपी अटकेत 23 जुलै पर्यंत वन कोठडी*
*कळमेश्वर वनपरिक्षेत्राधिकारी यांची कारवाई*
मोहपा(प्रतिनिधी)
नागपूर – वन विभागातील कळमेश्वर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या काटोल कळमेश्वर रोड वरील घोराड फाटा येथे वन्य जीवांची शिकार करून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 40 2010 या वाहनातून वाहतूक करून वन्य प्राण्यांचे मांस विक्री करिता नेत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावरून वनपरिक्षेत्र अधिकारी कु. ए आर नौकरकार यांनी शेत्र सहाय्यक एस एफ फुलझेले आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांनी मोक्यावर पोचून ऑटोरिक्षा ची झडती घेतली असता वाहनाच्या चालकाच्या सीट खाली तीन प्लास्टिक पिशव्या मध्ये रान डुक्कर या प्राण्याचे अडीच किलोग्रॅम मास आढळून आले व ऑटो रिक्षा च्या मागील सीटवर मृत अवस्थेत असलेले घुबड आणि सीट खाली जिवंत घोरपड आढळून आले वन्य प्राण्यांची शिकार करून वाहतूक करणाऱ्या ऑटोचालक आरोपी रोशन रामराव गणवीर वय 43 रा.चिंचभवन वर्धा रोड सह आरोपी गोलू नेतराम शाहू रा.चीजभवन वर्धा रोड यांची विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची चौकशी करून त्यांना वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले त्यानंतर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 23 जुलै पर्यंत वन कोठडी दिली आहे वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक नागपूर प्रभुनाथ शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रज्योत देवबा पालवे नागपूर करीत आहे वरील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी कु. ए आर नौकरकार, शेत्र सहाय्यक एस एफ फुलझेले ,व्हि एन कोल्हे, वनरक्षक डी एल खरबडे, आर धूर्वे, वनमजूर वी एस बोरकर, आर मोहब्बे, वाहनचालक श्रावण नागपुरे यांनी केली सदर गुन्हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची असल्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा असून तीन वर्षांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे दंडाची तरतूद असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.