*तहसीलदारांच्या मार्फत मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब , मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना विविध मागणीचे निवेदन*
*अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचा पुढाकार*
सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर
सावनेर – अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 24 जुलै 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर सफाई कामगारांचे मागण्याच्या पुर्ततेसाठी दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत सांकेतिक धरणा – निर्दशन आंदोलन ( कोवीड -19 चे नियम पाळून) तत्कालीन मुख्यमंत्री मा . श्री . देवेन्द्र फडणवीस साहेबा सोबत दिनांक 7 मार्च 2019 रोजी राज्यातील सफाई कामगारांचा प्रमुख मागण्या संदर्भातील शासकीय बैठक व दिनाक 29 जून 2019 रोजीचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र यांनी सभेच्या इतिवृत्तानुसार काढलेले परिपत्रकाच्या अनुषंगाने . महोदय , सेवेशी विनम्रपणे निवेदन आहे की उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या प्रलंबितत मागण्याचे संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री मा . देवेन्द्र फडणवीस साहेबांनी दिनांक 7 मार्च 2019 रोजी रामगिरी नागपूर उपराजधानी येथे मा.आमदार महोदय व संबंधीत अधिकारी व समाजाचे प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीती मध्ये बैठक घेवुन सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी दिशानिर्देश देण्यात आले होते*
*त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने दिनांक 29 जुन 2019 ला सभेच्या इतिवृत्ता प्रमाणे संबंधीत विभागास कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आले होते . पण आज पर्यंत संबंधीत विभागानी कोणतेही कारवाई केलेली नाही . त्यामुळे राज्यातील सफाई कामगारात तिव्र नाराजगी पसरलेली आहे , करीता विनंती आहे की , दिनांक 29 जून 2019 चे इतीवृत्ताची अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही व्हावी . सन 1993 पुर्वीचे सफाई कामगार जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांना सुध्दा वारसा हक्काचा लाभ देण्याबाबत आदेश निर्गमीत करावे . कोवीड -19 मध्ये कार्यरत नगरपालिका , महानगर पालिका व स्थानीय स्वराज्य संस्था मध्ये कार्यरत सफाई कामगारांना रु . 50,00,000 / – ( अक्षरी रुपये पन्नास लाख पक्त ) चा विमा कवच देण्यात यावे . तसेच महाराष्ट्र मध्ये कोवीड -19 मध्ये कामगीरी वर असतांना मरण पावलेले सफाई कामगारांना राज्य शासनाच्या वतीने रु . 50,00,000 / – ( अक्षरी रुपये पन्नास लाख फक्त ) ची विमा राशी देण्यात यावी . अनुसूचित जाती ला मिळणारे 1 3 % आरक्षण चे वर्गीकरण करुन मेहतर बाल्मीकी आणि वंशपरंपरागत सफाई करणारे समाजाला 5 % आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी भारतीय घटने प्रमाणे शासनाची उपाय योजना करावे*
*संपूर्ण राज्यात वाढती लोकसंख्या व क्षेत्रफला प्रमाणे एक लाख सफाई कामगारांची नवीन नौकर भरती करण्यांत यावी . तसेच सफाई कामगारांची वर्ग मधे पदोन्नती झाली असेल त्यांना सुध्दा वारस हक्काचा लाभ देण्यात यावे*
*करीता संघटनेच्या वतीने आपणांस विनंती करण्यात येत आहे की , सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्वरीत मुंबई ला सर्व अधिकारी सोबत बैठक आयोजित करुन प्रश्न निकाली काढण्यात यावे अशी विंनती निवेदनातून करण्यात आली आहे*
*याप्रसंगी सचिन लिडर, दशरथ मतेल,तीलक नकाशे,करन मोगरे,मुकेश महातो प्रामुख्याने उपस्थितीत होते*