*अज्ञात चोरट्यांनी केले अंदाजे दीड लाखांची चोरी..बोरडा सराखा येथील घटना*
मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी
मनसर – जवळील बोरडा सराखा या गावात रात्री खूप मोठी चोरी झाल्याची घटना लक्षात आली आहे. गावातील सर्व लोकं झोपी गेल्यानंतर अंदाजे 1.00 ते 1.30 वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समजत आहे.श्रीमती, उमाबाई देवराव चौधरी रा.बोरडा यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरांनी डाका टाकला.घरामागील दरवाज्याची साखळी काढून त्यांनी आत प्रवेश केला, असे घरमालकीचे सांगणे आहे.चोरांनी घरून तब्बल 70 हजार रु. आणि काही प्रमाणात सोना घेऊन गेल्याची माहिती दिली आहे.त्या महिलेने ही रक्कम एका लोखंडी ड्रम मध्ये ठेवले होते,आणि वरून कुलूप देखील लावले होते.पण चोरांनी घरामागील रस्त्याने येऊन कोणत्याही प्रकारचा आवाज न करता त्यांनी या चोरीला रूप दिला.सकाळी झोपून उठल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याबाबतची बाब लक्षात आली.या पाठोपाठ बोरडा टोली येथील रहवाशी श्री.रामेश्वर सुर्यवंशी यांच्या घरीदेखील चोरी झाल्याची माहिती मिळाली.त्यांच्या कथनानुसार 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन गेलेत असे लक्षात येते.सदर घटनेची माहिती मनसर येथील पोलीस चौकी यांना देण्यात आली,त्यांनी घटनास्थळी येऊन तपास करीत पंचनामा लिहून घेतले.यावेळी रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दिलीप ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते. एकूण 2 लाखांची चोरी ही आतापर्यंतची मोठी चोरी असल्याची गावातील लोकं सांगत आहेत.म्हणून या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.