*बीग ब्रेकीग*
*कन्हान नदिच्या पुरात पोकलेन,ट्रक,व टँक्टर बुडले*
*सावनेर राजस्व विभागाची टीम घटनास्थळी रवाना*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
नागपुर– *कन्हान नदीला अचानक आलेल्या पुरामुळे रामडोंगरी रेती घाटावर दोन पोकलेन,एक ट्रक व एक ट्रँक्टर नदिच्या पुरात बुडल्याची तसेच पोकलेन च्या बकेट मधे पाच सहा लोक फसुन असल्याची माहिती उघडकीस येत आहे*
*घटनेची माहिती सावनेर राजस्व विभागास मिळताच सावनेर राजस्व विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाल्याची माहीती तहसीलदार दिपक कारंडे यांनी दिली असुन सदर प्रकार हा कश्यामुळे घडला व सदर पोकलेन,ट्रक,ट्रँक्टर सदर रेती घाटावर कश्याकरिता गेले याचा तपास केल्या जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे*
*विदित असो की काहि दिवसापुर्वी कन्हान नदिच्या सर्व घाटावरून अवैध रित्या रेती चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत राज्याचे गु्हमंत्री व जि्ल्ह्याचे पालकमंत्री यांनी संपूर्ण ताफ्यासह रेतीघाटावर अवैध रेती चोरट्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते*
*तरीही आजचा घडलेला हा प्रकार रेती चोरीतूनच घडला असावा असे दबक्या आवाजात बोलले जात असले तरी पावसाळ्यात शासनाच्या आदेशानुसार कन्हान नदिच नव्हे तर सर्वच नदिवरिल रेतीघाट बंद राहत असुन नदीतील रेतीघाटावरूण रेती उचलण्याची पाबंदी असते तरीही कन्हान नदिच्या रामडोंगरी घाटासह इतर घाटावरून अश्याच प्रकारे नदिच्या प्रवाहातून मोठ्याप्रमाणात अवैधरीत्या रेतीची उचल कुणाच्या आशीर्वादाने केली जात आहे हा शोधाचा विषय बनत आहे*