*सावनेर तालुक्यात कोरोना संक्रमितांचा आकडा़ 151*
*पाटणसावंगीत परिसरात आणखी 8 कोरोना पॉझिटिव्ह*
*पाटनसावंगी ची हाप सेंच्युरी*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत पाटनसावंगी प्रतिनिधि
*सावनेरः सावनेर तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या आता दिड शतक पार करत 151वर पोहचली असुन सावनेर नगर पालीका 32,पाटनसावंगी 56,चिचोली खापरखेडा 41,खापा प्रा.आ.के 14,बडेगाव 1,केळवद 7 असे ग्रामीणचे 119 व सावनेर शहर 32 एकुण 151 असे आकडे निघून येत असले तरी सर्वात जास्त तालुक्यातील पाटणसावंगी व चिचोली खापरखेडा परिसरात कोरोना पॉझिटिव्ह होण्याची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आज आणखी 8 जणांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. त्यात सदभावना कॉलनी 6, पाटणसावंगी 1, सिल्लोरी येथे 1असे आहे…आधीचे 48 पॉझिटिव्ह मिळून येथील रुग्णसंख्या 56 वर पोहोचली आहे. तर सदभावना कॉलनीत काल एका वृद्ध महिलेचा व दहेगाव एक असा दोघांचा मृत्यू ही झाला आहे..*
*येथील वेकोली कर्मचाऱ्यांची वसाहत असलेली सदभावना कॉलनी रेड झोन मध्ये येऊन जिल्ह्यात सर्वांच्या चर्चेत आहे. येथील वाढती रुग्ण संख्या बघता पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची अंटीजन व घशातील लाळेची (आरटीपीसीआर) तपासणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दररोज घेणे सुरु आहे.*
*ग्रामपंचायत तर्फे नागरिकांच्या सुरक्षेसाठी गावात सॅनिटाइझरची फवारणी करण्यात येत आहे.. नागरिकांना मास्क घालणे व सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगण्यात येत आहे.*
*नागरिकही नियमांचे पालन करतांना दिसत असुन सुध्दा रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनासोबतच आरोग्य अधिकारी,तहसीलदार आदींच्या चिंतेत वाढ झाली असुन सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी व परिसरात एकूण 56 बाधितांची संख्या नोंदवत अव्वल स्थान प्राप्त करत तालुक्यातील हाँटस्पाँट बनला आहे*
*नागरिकांना सुरक्षितता राखण्याचे आव्हान*
*तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार चैताली दराडे,रवींद्र भेलावे मुख्याधिकारी सावनेर,तालुका कोवीड़ प्रबंधक डॉ.सोनोने,डॉ. भुषण सेंबेकर, डॉ. संदीप गुजर आदींनी तालुक्यातील समस्त नागरिकांना शासनाने कोवीड़19 विषाणूंच्या रोकथाम करीता दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण आपले आपल्या परिवाराचे व आपले गाव व शहरासह समाजाचे या संसर्गजन्य कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावापासुन संरक्षण करीत मात करण्यास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे*