*आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आचार्यश्री चा वाढदिवस संपूर्ण भारतात जडी़बुटी दिवस म्हणून साजरा*

*आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*आचार्यश्री चा वाढदिवस संपूर्ण भारतात जडी़बुटी दिवस म्हणून साजरा*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*
नागपूरपतंजली योग समितीच्या पाचही संघटनांनी मिळून आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांचा वाढदिवस जडीबुटी वितरण दिवस म्हणून आज दिनांक ०४-०८-२०२० ला कार्यक्रम मोठ्या उत्साहात नागपूर येथील लव- कुश नगर येथे साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम आधुनिक युगाचे धनवंतरी आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भारतामध्ये जडीबुटी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये पतंजली समन्वय समितीचे अध्यक्षआदरणीय प्रदीप जी काटेकर यांनी पाचही समिती ला उद्देशून प्रबोधन केले. त्यांनी जडीबुटी विषयी माहिती दिली. आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांना आजच्या युगाचे धनवंतरी असे संबोधन केले. आचार्य बाळकृष्ण महाराजांनी अतिशय मेहनतीने अनेक प्रकारच्या वनस्पती शोधून काढल्या, त्या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी काय उपयोगात येतात, याचा त्यांनी शोध लावला व आपल्या सामान्य जनांसाठी त्याची औषधीय वनस्पती बद्दल मोफत माहिती, नेहमी आस्था व इतर चैनल वर देत असतात.

कार्यक्रमास महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व च्या अध्यक्ष शोभाताई भागिया, नागपूर महिला समितीच्या जिल्हा प्रभारी उर्मिलाताई जूवारकर, महिला पतंजलीच्या सह प्रभारी व योग प्रचारक आदरणीय माधुरी ठाकरे, नागपूर पतंजली समितीचे अध्यक्ष आदरणीय छाजुरामजी शर्मा, युवा प्रभारी पंकज बांते, कोषाध्यक्ष दीपक येवले, महामंत्री रितू जर्गर. युवा सह प्रभारी निखिल भुते, महिला पतंजलीच्या शोभा बिहारे, शारदाताई वराडे, माधुरी निंबुळकर,कार्यालय प्रभारी भावना टेंबरे, संवाद प्रभारी दिपक जरगर, डॉक्टर स्मिता कोचे, सविता इंगळे उपस्थित होत्या.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय कोषाध्यक्ष दिपक जी येवले यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन पतंजली योग समितीच्या मीडिया प्रभारी जोत्सना इंगळे यांनी केले त्यानंतर रक्षाबंधनानिमित्त सर्व बहिणींनी पतंजलीसमितीच्या सर्व बांधवांना राखी बांधून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी त्याच ग्रीन जिम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …