*मंत्री सुनील केदार यांनी दिले चौकशीचे आदेश*
*कळमेश्वर नगर पालिका बागीचा संरक्षक भिंत कोसळल्याचे प्रकरण*
*मंत्री सुनील केदार ने घेतली महाराष्ट्र न्यूज़ मीडिया ची दखल*
*विशेष प्रतिनिधी कळमेश्वर*
*कळमेश्वर ः उद्घाटनापूर्वी कोसळली संरक्षक भिंत या मथळ्याखाली महाराष्ट्र न्यूज मीडिया या सोशल मीडिया सह अनेक वर्तमानपत्रात प्रखरतेने वृत्त प्रकाशित होताच या प्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रिडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या महाराष्ट्र न्यूज़ मीडिया व वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र न्यूज़ मीडिया ची बातमी लागतच कळमेश्वर पालिकेच्या पदाधिकारी आणि अधीकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून सुरक्षा भिंत आणि शौचालय घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहे.
कळमेश्वर नगर पालिका अंतर्गत 14वा वित्त आयोगातून कळमेश्वर नगरपालिका कार्यालयासमोर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बगीच्या सौंदर्यीकरण करण्यात आले होते तसेच 14 वित्त आयोगातून बगीच्या लगत असलेल्या नाल्याच्या भिंती शेजारी संरक्षक भिंत वीस वर्ष जुन्या दगडाच्या भिंतीवर बांधण्यात आली होती अंदाज पत्रक हे जुनी दगडाची भिंत तोडून नवीन भिंत बांधण्याबाबत तयार करण्यात आल्याची चर्चा होती वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कळमेश्वर नगरपालिका जुन्या मामा तलावाशेजारी बगीच्याचे सौंदर्यीकरण आणि बगिच्याला लागून असलेल्या नाल्यालागत संरक्षक भिंतीचे बांधकाम लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच करण्यात आले होते बगीच्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून बगीच्याचे उद्घाटन प्रतिक्षेत होते पण त्यापूर्वीच झालेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही सोबतच नव्याने बांधकाम करण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम सुद्धा खचलेले आहे हे बांधकाम 28 लक्ष रुपयांचे असून केवळ 12 लक्ष रुपयांचा खर्च या बांधकामावर झाल्याची माहिती आहे. या कामात मोठी अनियमितता झाल्याने सुरक्षा भिंत आणि शौचालय बांधकाम करणारे कंत्राटदार आणि पालिकेचा बांधकाम विभाग यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती आहे.
*पालिकेचे स्वच्छता सर्वेक्षण अभियान धोक्यात..*
झालेल्या पावसामुळे पडलेली संरक्षण भिंत आणि त्याच बरोबर स्वच्छता सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून रोल मॉडेल म्हणून बगीच्यामध्ये सहा महिन्यापूर्वी बांधण्यात आलेले शौचालय खचल्यामुळे पालिकेचे स्वच्छता सर्वेक्षण अभियान अंतर्गत मिळणारा पुरस्कार धोक्यात आला आहे. स्वच्छता सर्वेक्षण अभियाना मध्ये कळमेश्वर पालिका सहभागी झाली असून याआधी पालिकेला अ दर्जा मिळालेला आहे सर्वेक्षण अभियान अजूनही सुरू असून रोल मॉडेल साठी हे शौचालय तयार करण्यात आल्याची माहिती असून या मॉडेलमुळे पालिकेला अजून जास्तीचे गुण मिळणार होते आणि त्याच माध्यमातून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा पुरस्कार सुद्धा मिळणार असल्याची माहिती आहे आता आहे हे रोल मॉडेल असलेले शौचालय कोसळल्याने पालिकेच्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे विशेष*