*जाम मध्यम प्रकल्प शंभरीच्या वाटेवर*

*काटोल-नरखेड तालुक्यातील जाम नदी काठावरिल गावांना सतर्चतेचा ईशारा*
*उप जिल्हा प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे*
काटोल – तालुक्यात जाम नदी प्रकल्प २०आॅगस्ट२०२० पर्यंत९७%टक्के भरले असुन तसेच सतत पाऊस सुरू आहे। व पर्जन्यवृष्टी सुरू राहिल्यास जाम नदी प्रकल्प (धरण)१००%भरून सांडव्यावरून पाणी वाहून नदीला पुर येऊ शकतो। या कारनास्तव काटोल व नरखेड तालुक्यातील जाम नदी काठावरिल गावात राहनारे गावकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे ।

या करिता पाटबंधारे उपविभाग सहायक अभियंत्रण श्रेणी-१ काटोल यांचे कार्यालयाने जाम नदी काठावरिल गावांची यादी ही जाहिर केली आहे । रिधोरा, सावळी, खापरी खुर्द,पेठ इस्लामपुर काटोल, पारडसिंगा, भिष्णूर, नायगाव धोटे, भारसिंगी नारसिंगी, जामगाव, रोहणा, जलालखेडा, मेंढला, सिंजर, उमठा, खरबडी, वडविहीरा लहान, थाटूरवाडा, वाढोणा, दिग्रस, शाहजापूर, महेन्द्री, पेठ, इस्लामपुर, या गावकर्यांनी आपल्या स्तरेवर सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे । अशी माहीती सहायक अभियंता पाटबंधारे उपविभाग काटोल नजीर रिझवी यांनी दिली आहे तर जाम प्रकल्पाची साठवण क्षमता २९•००द ल घ मि मी जिवंत साठा २४•७२४द ल घ मिमी असून मृत साठा०४•२४द ल घ मि मी असून अद्यावत स्थिती २३•४०९द ल घ मि मि एम एम 3(९७%) इतकी असल्याची माहिती तांत्रिक अधिकारी संदिप सपकाळ यांनी दीली आहे ।
Maharashtra News Media सच की आवाज