*नित्या आय.व्ही.एफ. & निओलाईफ सेंटर मध्ये आय.व्ही.एफ आणि लाईफ लाईन ब्लड बँक स्टोरेज चे उद्घाटन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर : नागपूर तालुक्यातील सावनेर येथे ग्रामीण आरोग्य सेवांना मोठे बळ मिळाले आहे. नित्या आय.व्ही.एफ. व निओलाईफ सेंटर आणि लाईफलाईन ब्लड बँक युनिट या दोन अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे आज भव्य उद्घाटन झाले. विशेष म्हणजे, नित्या आय.व्ही.एफ. निओलाईफ सेंटर हे तालुक्यातील पहिले आय.व्ही.एफ सेंटर आहे. यामुळे ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या प्रजनन समस्या सोडवण्यासाठी हा क्रांतिकारी टप्पा ठरेल.
नित्या आय.व्ही.एफ. & निओलाईफ सेंटरचे संचालक डॉ.प्राची भगत म्हणाल्या कि ‘आता वंद्धत्वचे प्रमाण खूप वाढत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आय.व्ही.एफ. सेंटरची आवशक्यता आहे त्यामुळे आय.व्ही.एफ. सेंटर उघडले आहे.

लाईफलाईन ब्लड बँकचे संचालक डॉ. हरीश वर्भे म्हणाले, “ग्रामीण भागात अपघात, प्रसूती आणि आजारांमुळे रक्ताची नेहमी तीव्र गरज भासते. ही ब्लड बँक २४x७ सेवा पुरवेल आणि रक्तदाते नेटवर्क वाढवेल.” दुसरीकडे, आय.व्ही.एफ सेंटरमुळे *आय.व्ही.एफ., आय.यु.आय. सह* इतर प्रजनन उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. यामुळे रुग्णांना शहरी भागातील त्रासदायक आणि महाग प्रवासाची गरज भासणार नाही.

उदघाटक संध्या पोतदार, माधुरी भगत, डॉ. कृष्णराव भगत या प्रकल्पाच्या यशस्वरूपात डॉ. प्रमोद पोतदार, डॉ. प्राची भगत, डॉ. हेमंत भगत, डॉ. रश्मी भगत यांचे मोलाचे योगदान आहे. उद्घाटन सोहळ्यात लुनकरन चांडक, ऍड. पल्लवी मुलमुले, ऍड. अभिषेक मुलमुले, भोयर सर, दिलीप ठाकरे, विनोद बोबडे, शलाका पोतदार, निर्मला सुपरटकर, समीर उके उपस्थित होते. सर्वांनी अशा सुविधा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
जेथे ग्रामीण भागात आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत, तेथे ही रक्त बँक आणि आय.व्ही.एफ सेंटर मृत्यूदर कमी करतील आणि कुटुंबांना पूर्ण होण्यास मदत करतील. ही सुविधा तालुक्याच्या आरोग्यक्रांतीची पायाभरणी आहे.
Maharashtra News Media सच की आवाज