*सावनेरमधील विक्रेत्यांची लूट होऊ देणार नाही*
*बाजार शुल्क वसुलीत पारदर्शकता आणणार*
*ठराविक दरानुसारच बाजार शुल्क वसुली होणार सौ. संजना मंदार मंगळे,नगराध्यक्षा नगर परिषद सावनेर*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर ः नगर परिषद सावनेर येथे दि. 24/02/2022 रोजी नगर परिषद सावनेर येथे तत्कालीन प्रशासक मा.अतुलजी मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सावनेर शहरातील दैनंदिन बाजार व आठवडी बाजार शुल्क वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया राबवून कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बाजारातील विक्रेत्यांना नियोजित जागांवर बसविणे, बाजार परिसर स्वच्छ ठेवणे, ओला व सुका कचरा व्यवस्थापन करणे, बाजाराच्या दिवशी वाहतूक नियंत्रण ठेवणे आणि रस्त्यावर अनधिकृतपणे बसणाऱ्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे हे उद्दिष्ट देखील या निर्णयामागे होते. त्यावेळी सभेत झालेल्या चर्चेनंतर सावनेर शहरातील किरकोळ भाजीपाला व इतर व्यापाऱ्यांना खालील नगर परिषद मालकीच्या जागांवर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता*

*शहरातील मध्यभागी चिरघरजवळील जागा,दलाल मार्केट परिसर,गोल मार्केट,जुना धान्यगंज मार्केट व तसेच त्यावेळी सुद्धा नगर परिषदेने दर निश्चित करून दिले होते प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून या दरांचे पालन न करता सावनेरमधील भाजीपाला विक्रेते व फुटपाथवरील लहान व्यापाऱ्यांकडून चार पटपर्यंत अवैध वसुली केल्याच्या तक्रारी पुढे आल्या. 2022 साली बाजार वसुलीच्या लिलावाची शासकीय बोली ₹18,71,000 इतकी होती, जी दरवर्षी वाढत जाऊन सध्या सुमारे ₹61 लाखांपर्यंत पोहोचली आहे. परंतु 2025 मध्ये झालेल्या नगर परिषद सावनेरच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान अनेक विक्रेते, व्यापारी संघटना व विविध संघटनांनी कंत्राटदारामार्फत होत असलेल्या अवैध वसुलीबाबत, दमदाटी, धमक्या व मारहाणीच्या तक्रारी मांडल्या होत्या. त्या वेळी नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे यांनी निवडून आल्यास अवैध बाजार चिट्ठी वसुली बंद करण्याचे व अवैध कुठल्याही प्रकारचे दर आकारण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते.*

*यानंतर काही दिवसांपूर्वी अनेक विक्रेते व व्यापारी संघटनांनी मा. मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देऊन बाजार शुल्क शासकीय दरानुसार घेण्याची मागणी केली होती लिलावाची मुदत संपल्यानंतर ही आम्ही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत ठरावीक दरानुसार बाजार चिट्ठी वसुली सुरू देखील केली होती मात्र काहींना यात गावाचे हित नाही तर राजकारण करायचे आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते यांनी दि. 21/02/2026 रोजी मा. जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार दाखल केली. त्यामुळे हा विषय प्रशासकीय असल्याने बाजारचिट्ठी लिलाव करण्याची प्रक्रिया बंधनकारक आहे तथापि, नगर परिषदेने बाजार शुल्काचे दर पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत 5 × 10 चौ.फूट जागा – ₹10, 10 × 15 चौ.फूट जागा – ₹20,10 × 20 चौ.फूट जागा – ₹30 हॉटेल किंवा इतर व्यवसाय (आठवडी बाजार दिवशी) – ₹50 या निश्चित केलेल्या दरानुसारच भविष्यात कंत्राटदाराने बाजार शुल्क आकारणे बंधनकारक राहील*

*या व्यतिरिक्त कुठलीही अवैध वसुली होऊ देणार नाही वसुलीत पारदर्शकता राहावी यासाठी कर निरीक्षक यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात येईल व कंत्राटदाराने ठराविक दरापेक्षा जास्त वसुली केल्यास काळ्या यादीत टाकून भरलेली अनामत रक्कम व उर्वरित भरलेली पूर्ण रक्कम जप्त करून कठोर कारवाई करण्यात येईल असेही पत्रपरिषदेत नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे यांनी ठामपणे सांगितले*

*सावनेर शहरातील गोरगरीब भाजीपाला विक्रेते लहान व्यावसायिक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्या कष्टावरच शहराची बाजारपेठ उभी आहे त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ देणे अजिबात सहन केले जाणार नाही कोणत्याही प्रकारची पुढे अवैध वसुली करत असल्याचे आढळल्यास व्यापारी संघ, फुटपाथ दुकान संघटना, भाजी विक्रेते व थोक व्यापारी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रीतसर तशी नगर परिषद ला तक्रार करावी जेणेकरून कंत्राटदारावर कारवाई करता येईल अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे यांनी दिली.*
*शहराच्या प्रथम नागरिक म्हणून याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारत त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्णपणे पार पाडणार , असे मत नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे यांनी व्यक्त केले.*
*तर निवडणुकीत आपल्या दिलेल्या जाहिरनाम्यानुसार जमिनीस्तरावर निवडणूक आलेल्या नगराध्यक्षा सह त्यांचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी एकजीव होऊन शहराच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नागरिकात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे*
*नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे,न.प उपाध्यक्ष राजूभाऊ घुगल, गटनेते रविंद्रजी ठाकूर, अरविंद ताजने,मंदार मंगळे,निलेश पटे, राजेश गुप्ता,महेश चकोले,दुर्गेश पारवे, नगरसेविका सौ. चित्रा वाठ, सौ.रीमा बालाखे,सौ. योगिता घोरमारे, सौ.अश्विनीताई सय्याम,समस्त पदाधिकारी उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज