*दोन युवक तलावत बुड़ाले* *बुडालेल्या तरूणांचा थांग पत्ता नाही* *नागपुर ची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल* *रिधोरा जाम प्रकल्प येथील घटना*

*दोन युवक तलावत बुड़ाले*

*बुडालेल्या तरूणांचा थांग पत्ता नाही*

*नागपुर ची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल*

*रिधोरा जाम प्रकल्प येथील घटना*

*उप जिल्हा प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे*

काटोलतालुक्यातील रिधोरा येथील जाम प्रकल्प नुकताच 100% भरला असून पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. परंतु पर्यटनासाठी येथे आलेल्या सात आठ तरुणांचा आनंद त्यांच्या जीवावर बेतला.

सात आठ युवकांपैकी काही युवक नागपुर नरखेड तालुक्यातील खुशालपुर, दिन्दरगाव, भिष्णुर, येथील असून त्यापैकी नौकायान करण्याच्या बेतात तलावामधिल किनार्यावर मच्च्छिमारांनी बांधून ठेवलेले डोंगे, युवकांनी सोडले व तलावात डोंग्यांसह सहा मित्र एकाच डोंग्यात तलावात नौका यान करू लागले, यांना नौका(डोंगा) चालविता येत नसल्याने नौका काही दुर खोल पाण्यात पोहचताच नौका(डोंगा) उलटला या डोंग्या मधील कुणाल धोटे(35) खुशालपुर, राकेश खरपकर भिष्णुर (30) हे तरूण पाण्यात बुडाले, याबाबद ची माहिती सोबतचे बाकी तुषार धोटे, शैलेश कोठे, अनिल नागमोते, अमोल कोठे, मयूर धोटे हे तरुण पोहत काठावर सुखरूप पोहचले.
तरुण बुडाल्याची बातमी कळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिति सदस्य संजय डांगोरे , जलयुक्त शिवार प्रतिनिधि भूषण मुसळे गावच्या पोलिस पाटिल सुषमा मुसळे यांनी घटना स्थळ गाठून काटोल पोलिसांना माहिती दिली
काटोलचे तहसीलदार अजय चरडे ,पोलिस निरीक्षक आचरेकर यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली व पुढील तपास सुरु केला आहे।

पाण्यात बुडालेले तरूणांचा शोध काटोल पोलिस व नागपुर ची रेस्क्यू टीम घेत आहे बातमी लिहे दोन्ही तरूणांचा पत्ता लागला नव्हता रात्र झाल्याने पोलीसांकडून शोध मोहीम थांबविली होती।

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …