*जुगार अडयावर पोलीसाची धाड* *१० जुगाऱ्याना अटक* *५ लाख २९ हजार ७८०रूपये जप्त*

*जुगार अडयावर पोलीसाची धाड*

*१० जुगाऱ्याना अटक*

*५ लाख २९ हजार ७८०रूपये जप्त*


प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलालखेडा (ता.नरखेड) येथील जुगार अडयावर पोलिसांनी धाड टाकत जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक केली.त्यांच्या कडून एक कार ,एक मोटरसायकल २६ हजार ७८० रूपये रोख रक्कम ,,१० मोबाईल,हँडसेटव अशी एकुन ५ लाख २९ हजार ७८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाही शुक्रवारी दि.२१ रात्री ९ वाजता करणेत आली .

चंदु मुरलीधर मोहाड ,राजु गुलाबराव गिरी,विजय हरीशंकर पुरोहीत,हे तिघेही रा.वरुड जि.अमरावती,रामकृष्णा उदयभान कडु,संजय भाऊराव नारनवरे,चंद्रशेखर तुकाराम अलोणे,हे सर्व रा.जलालखेडा ता.नरखेड व विजय धनू पराते,नरेंद्र वासुदेव ठाकरे,रा.खडकी (जलालखेडा ) ता.नरखेड स्वपनील लतेश ईखार,कुलदीप संदीप चांडाक रा.काटोल अशी अटक करण्यारा जुगार खेळणारेची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नरखेड तालुक्यात गस्तीवर असताना त्यांना जलालखेडा येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती.या पथकाने पाहणी करून त्या जुगार अडयावर धाड टाकली आणि खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकारनी जलालखेडा पोलिसांनी गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे .ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते,हेड काँनस्टेबल सुनील मिश्रा यांच्या पथकाने केलीत.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …