*प्राणघातक हल्ल्यातील ३ आरोपींना अटक १ फरार* *पो.नि.निशांत फुलेकर यांनी आवरल्या आरोपींच्या मुसक्या*

*प्राणघातक हल्ल्यातील ३ आरोपींना अटक १ फरार*

*पो.नि.निशांत फुलेकर यांनी आवरल्या आरोपींच्या मुसक्या*

*विशेष प्रतिनिधी पाटनसावंगी*

पाटणसावंगी : नागपूर सावनेर महामार्गावर सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा ( डा ब ) येथील एम एच ४७ नामक ढाब्यावर दि २१ जुलै ला रात्री ९.३० च्या सुमारास पिपळा (डा ब) येथील प्रदीप बाळू सावरकर (२९) हा फोनवर बोलत असल्याचे पाहून त्याच्यावर घातपात करण्याच्या इराद्याने चौघां युवकांनी धारदार शस्त्राने व लात बुक्क्यांने प्राणघातक हल्ला केला होता,

त्यात प्रदीप हा गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यातील ४ आरोपी या घटनेनंतर फरार झाले होते. तीन आरोपींना घटनेत वापरलेल्या साहित्या सह अटक करण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांना यश आले आहे तर एक आरोपी फरार आहे. सदर घटनेतील आरोपींमध्ये १) गोलू अण्णाजी ढेपे (२९) रा इसापूर, २)बंटी गौतम मेश्राम (२०) रा वलनी वस्ती, ३)सौरव अरुण उद्धार (२८) रा इसापूर व ४) शुभम बंडू मेश्राम (२३) रा इसापूर यांचा समावेश होता. त्यातील शुभम मेश्राम हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेणे सुरु आहे…
आरोपीविरुद्ध भा दं वि ३०७,३२६,३२३,३४ सह कलम ४/२५ आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …