*अवैध वाळूची वाहतूक ; 4 ट्रक ताब्यात* *राजकीय मासे लागले गळाला*

*अवैध वाळूची वाहतूक ; 4 ट्रक ताब्यात*

*राजकीय मासे लागले गळाला*

खात प्रतिनिधी – तुषार कुंजेकर
मौदा/खातपोलिस स्टेशन अरोली हद्दीत 1 वाजेदरम्यान भंडारा कडून महालगांवकडे येणारे ट्रक क्र एमएच 40 बी जी 5776 व एमएच 34 7222 यामधून विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतुक करताना मिळून आल्याने 2 ट्रक किंमत 24,00,000 रुपये सह 10 ब्रास रेती 30000 रुपये असा एकूण 24,30,000/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून चालक व मालक आरोपी 1) अफजल मेहबुब शेख (37 वर्ष) रा. बुट्टीबोरी 2) मुबारक अकबर सय्यद (38 वर्ष) रा ताजबाग नागपूर यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम 379 , 109 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच 3:45 वाजे दरम्यान भंडारा कडुन कोदामेंढी – भांडेवाडीकडे येणारे ट्रक क्रमांक एमएच 40 एके 6070 व एमएच 40 एटी 7070 यामधून विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतुक करताना मिळून आल्याने 2 ट्रक किंमत 28,00,000 रुपये सह 10 ब्रास रेती 30000 रुपये असा एकूण 28,30,000/- रु चा माल ताब्यात घेण्यात आला असून चालक व मालक परमेश्वर यशवंतराव चरडे (40 वर्ष) रा काचुरवाही, अरुण लक्ष्मण पोटभरे (42 वर्ष) रा चाचेर, अजय राजु वाघमारे रा चाचेर यांचेवर भा.द.वि.कलम 379, 109 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

अशा 2 गुन्ह्यात 24,30,000 व 28,30,000 असा एकुण 52,60,000 रुपयाचा मालासह 5 आरोपी ताब्यात घेतले.

ट्रक क्रमांक एमएच 40 एके 6070 व एमएच 40 एटी 7070 अनुक्रमे चंद्रकला बरबटे व कैलास बरबटे यांचे मालकीचे आहेत. मात्र अरोलीचे ठाणेदार यांनी पाठवलेल्या प्रेस नोट मध्ये त्यांचे नावांचा उल्लेख नाही. पोलिस विभाग राजकीय नेत्यांसमोर नतमस्तक होतो, हे याचे जीवंत उदाहरण आहे.

प्रतिक्रिया,  विवेक सोनवणे सहायक निरीक्षक अरोली

हे ट्रक कैलास बरबटे यांचा नावाचे नाही आहे त्यांच्या भाचा अजय वाघमारे च्या नावाने आहे.पण गाडी नंबर आरटीओ साईड वर शोधले असता दोन्ही गाडी चे नाव वेगळे आहेत कैलास बरबटे व चंद्रकला बरबटे यांचा नावावर आहे अरोली ठाणेदार खोटे बोलले 

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …