*कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताच्या साठ्यात कमी होऊ नये म्हणून विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियने संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्य ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन:- केद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे*

*कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताच्या साठ्यात कमी होऊ नये म्हणून विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियने संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्य ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन:- केद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत असुन कोरोना ग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या मनोरंजन क्लब नं २, विघुत विहार वसाहत येथे विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


कोराडी औष्णिक विघुत केंद्र मनोरंजन क्लब नं२ येथे विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या ४३व्या वर्धापन दिना चे औचित्य साधून जीवन ज्याेती ब्लड बॅक नागपूर चे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्या प्रंसगी कोराडी २१० मेंगावाट चे मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती मातेचा प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उप मुख्य अभियंता सोनपेठकर, कल्याण अधिकारी वाजूरकर, वैद्यकीय अधिकारी डाँ मुकेश गजभिये व केंद्रिय उपाध्यक्ष गजानन सुपे उपस्थित होते. त्या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून तोंडावर मास्क व सोशल डिस्टन चे पालन करण्यात आले होते. तसेच मुख्य अभियंता तासकर म्हणाले कोरोना विषाणूचा पादुर्भाव दिवसेदिवस वाढत असल्यामुळे रक्ताची कमतरता भासू देऊ नका रक्तदान हे सर्वात मोठे श्रेष्ठ दान आहे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे असे त्या प्रसंगी बोलत होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वंजारी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप ताजने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे शैलेंद्र अर्जितवार आणि झोन व शाखा पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …