*सरकारी कार्यालयातच पाळले जात नाही सरकारचे नियम*
*बँक ऑफ इंडिया कान्द्री येथील प्रकार*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक- सद्या जिकडे-तिकडे कोविड-19 च्या कोरोना या महामारीमुळे सर्व जग हादरून गेला आहे.रोज लाखोंच्या संख्येने नवीन नवीन रुग्ण येतांना निदर्शनास येत आहे.अशा वेळी देशात अथवा प्रत्येक राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही नवीन प्रकारचे नियम लागू केले आहेत.सोशल अंतर ठेवणे,तोंडावर मास्क घालणे,सोबत सॅनिटायझर चा वापर,काम असल्यावरच घराच्या बाहेर पडावे अश्या प्रकारचे नवीन नियम अथवा आग्रह सरकारने केले आहे.असाच एक प्रकार कान्द्री गावात असणाऱ्या बँक मध्ये दिसून आलेला आहे.सरकारी कार्यालयाच्या मुख्य गेट समोर सर्वांनी मास्क चा वापर करावा अशी सूचना देखील लावली असते.आणि लोकं त्या सूचनेचा पालन देखील करतात,पण एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या वेळी अतिशय महत्त्वाचा काम येतो आणि तेव्हा तो आपल्या सोबत मास्क किव्हा इतर वस्तू नेण्यास विसरतो.काल देखील असाच प्रकार घडला.पैशाची अत्यंत गरज असल्यामुळे तो व्यक्ती घाईने बँक मध्ये गेला आणि लाईन मध्ये लागला.तर त्याला बँक मॅनेजर श्री.मनोज नंदेश्वर यांनी त्या व्यक्तीस बाहेर जाण्यास सांगितले.त्यांनी मॅनेजरला उलट प्रश्न केला की तुम्ही मला मास्क घाल म्हणता पण तुमच्या तोंडावर मास्क का बरं नाही ? तर त्यांनी सरळ त्यांना बँक च्या बाहेर काढलं.
आता प्रश्न हा पडला आहे की हे नियम फक्त गोर गरीब लोकांसाठीच आहेत की सर्वांसाठी आहेत.मग सर्वांसाठी आहेत तर सरकारी कर्मचारी त्या नियमाचे पालन का करीत नाही ?