*मंत्री सुनील केदार यांना करोनाची लागण*
*केदार यांना ताप आणि घसादुखीचा त्रास होत होता*
*मुंबईत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले
नागपुर- दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना करोनाची लागण झाली असून, त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केदार यांना ताप आणि घसादुखीचा त्रास होत होता. त्यांच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, संजय बनसोड या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. करोनाचा संसर्ग झालेले केदार हे आठवे मंत्री आहेत.
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ते मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाच्या चाचणीत त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासले असता कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.
अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व मंत्री आणि संबंधितांनी कोरोनाची चाचणी करूनच यावे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. असे बंधनकारक करण्यात आले असल्याने मंत्री सुनील केदार यांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ब्रीच कॅन्डीचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवून आहेत.
यानंतर त्यांची ॲन्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरील उपचाराबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यामुळे केदार अधिवेशनात सहभागी होऊ शकतील की नाही, यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
मंत्री केदार उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये राहतील की गृहविलगीकरणात, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. पण दुसरी तपासणी झाल्यानंतर डॉक्टर याबाबत निर्णय घेतील, असे त्यांच्या निकटतम सहकाऱ्यांनी सांगितले. सुनील केदार नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
नागपुरात असताना ते सतत जिल्ह्याचा दौरा करीत असतात. याशिवाय अधिकाऱ्यांच्या बैठकाही ते नियमितपणे घेतात. सतत लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.