*नागपुरचे आयुक्त राधाकृष्णन बी अॅक्शन मोडमध्ये*
नागपुर प्रतिनिधि- पवन कीरपाने
नागपूर – महापालिकेचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी पदभार स्वीकारल्यापासून अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावर आयुक्तांनी कारवाई केली.
याआधी माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आंबेकरच्या एका बंगल्यावर कारवाई केली होती.राधाकृष्णन बी यांनी डॉन संतोष आंबेकरचा अवैध बंगला पाडण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानंतर आंबेकरचा बंगला पाडण्याची कारवाई सुरु झाली. अडीच हजार स्क्वेअर फूट जागेत असलेल्या अवैध बंगल्यावर पालिकेने कारवाई सुरु केली. संतोष आंबेकरच्या पत्नीच्या नावे चार मजली बंगला आहे.नागपूर महानगरपालिकेने संतोष आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली होती. मात्र त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नसल्याने तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते.
एक बंगला जमीनदोस्त झाल्यावर आता आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दुसऱ्या बंगल्यावर कारवाई केली.तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर मनपा कर्मचारी कार्यालयात पुन्हा उशिरा येऊ लागले होते. त्यामुळे राधाकृष्णन बी. यांनीही तुकाराम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनपाच्या तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.