*विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात*
*रक्तदान शिबिरात १६९ रक्तदात्यांनी केले रक्तदान*
*खापरखेडा-प्रतिनिधी*
खापरखेड़ा- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचा ४३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे देशासह राज्यात लाखो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत राज्यात रक्ताचा तुटवडा आहे त्यामुळे केंद्रीय कार्यकारणीच्या आदेशानव्ये संघटनेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात संघटनेच्या सभासदांना रक्तदान करण्याचे आव्हाण करण्यात आले संघटनेच्या शत-प्रतिशत सभासदांनी राज्याच्या विविध भागात रक्तदान केले विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेची शाखा खापरखेडा येथे महाराष्ट्र शासन व महानिर्मिती व्यवस्थापन प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशनाचे काटेकोर पणे पालन करून वीज केंद्राच्या सदभावना कामगार मनोरंजन गृह क्रमांक २ येथे भारतीय सेनेच्या सैनिक बांधवा करिता ३० व ३१ आगस्ट तसेच ०३, ०४ सप्टेंबर २०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तसंकलन जीवन ज्योती रक्तपेढी, नागपूर यांनी रकेले.
सदर रक्तदान शिबिरात जवळपास १६९ रक्तदात्यांनी अमूल्य रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिराला स्थानिक वीज केंद्र व्यवस्थापनाचे मोलाचे सहकार्य लाभले वर्धापन दिन व रक्तदान शिबिर केंद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते वर्धापन दिन व रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता झोन व शाखा कार्यकारणीचे पदाधिकारी व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.