*वाढता कोरुना विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता वरच्यावर सॅनिटायझर फवारणी करा*
*नगरसेवक तुषार उमाटे यांची मुख्याधिकारी यांना मागणी*
सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर
सावनेर– शहरात खूप जास्त प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे व अनेक घरी कोरना रुग्ण सुद्धा आहे ते पाहता आपण दररोज कोरोना विषाणूचे प्रमाण कमी करणारा सॅनिटायझर फवारणी मुख्य बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी वरच्यावर फवारणी करण्यात यावी व जेथे रुग्ण आहे त्या परिसरात आपण फवारणीची योजना बनवावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सर्वविदीत आहे की देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असुन वाढत्या कामाच्या ताणामुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली आहे.व त्यामुळे नगरवासियांना पुरविण्यात येणार्या मुलभूत सोईसुविधांचा आभाव नक्कीच जाणून लागला आहे अश्यात नगरसेवक म्हणून आपली ही काही नैतिक जबाबदारी आहे.प्रशासन जीथेकुठे कमी पडत आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व नगरीत वरच्यावर कोरोना विषाणूंचा रोकथाम करीता फवारणी व्हावी अशी मागणी नगरसेवक तुषार उमाटे उर्फ बंटी महाजन यांनी निवेदनातून मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांना केली आहे.