*नागपूर शहरातील कोव्हिड संदर्भातील स्थितीचा २१ सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची आढावा बैठक*
*कोव्हिड संदर्भातील महानगरपालिकेच्या कार्यामध्ये अजूनही सुधारणा आवश्यक आहे- देवेंद्र फडणवीस*
नागपुर प्रतिनिधि- पवन किरापाने
नागपूर- शहरातील कोव्हिड संदर्भातील स्थितीचा आज २१ सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आढावा घेतला. मनपाच्या आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी आणि शहरातील सर्व आमदार, आयुक्त व अन्य अधिकारीयों उपस्थित होते. नागपूर शहरातील कोव्हिड संदर्भातील महानगरपालिकेच्या कार्यामध्ये अजूनही सुधारणा आवश्यक आहे असे श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय रुग्णांना बेड्स उपलब्ध व्हावे यासाठी ‘एसएमएस’ प्रणाली सुरू करणे, ‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी उत्तम आरोग्य सेवेसाठी छोटी रुग्णालये उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. मनपामध्ये दररोज सुरू असलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह उपक्रमांचेही श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले.