*डॉक्टर प्रेम हारोडे यांना कोविड योद्धा चा समान*
मौदा प्रतिनिधि
मौदा- तालुक्यातही चिंचोली येथील डॉक्टर प्रेम हारोडे यांचा परमात्मा महाप्रसाद ग्रुप तर्फे कोरोना योद्धा म्हणून नुकताच सत्कार करण्यात आला डॉक्टर हारोडे यांनी कोरोना काळात ग्रामीण भागातील रुग्णांना अहोरात्र सेवा दिली आणि आजही देत आहे नागपूर जिल्हा आणि अन्य जिल्यातील विविध व्याधी असलेल्या रुग्णावर त्यांनी यशस्वी पणे उपचार केलेला आहे या सत्कार प्रसंगी महाप्रसाद ग्रुप चे विश्वास येस्कर धर्मराज मदनकार आणि अनेक कार्येकर्ते उपस्थित होते ड्रॉक्टर हारोडे हे मागील चाळीस वर्षांपासून आपल्या चिंचोली येथील दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात रुग्णसेवा देत एक प्रगतिशील शेतकरी आणि सामाजिक कार्येकर्ते म्हणून ते तालुक्यात सुपरिचित आहेत.