*केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच*
*राजकीय हेतूनेच काँग्रेससह विरोधी पक्ष करताहेत विरोध, मोदी सरकार शेतकरीहितार्थ निर्णय घेणारे- सुधीर दिवे*
वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
वर्धा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे – सुधीर दिवे
केंद्र सरकारने शेतकरी हितार्थ आणलेले विधेयक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही स्वातंत्र्य देणारेच आहे. पण काँग्रेससह इतर विरोधक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून संभ्रम पसरवून त्याला विरोध करीत असल्याची टीका आयोजित पत्रकार परिषदेतून भाजपचे महासचिव सुधीर दिवे यांनी केली.
दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे. पण कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलविणाऱ्या या विधेयकांना काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. या नवीन विधेयकांना कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अन्यही पर्याय उपलब्ध होणार आहेत. शिवाय शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. एकूणच याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. असे असले तरी विरोधकांकडून विविध अफवा पसरविल्या जात आहेत. विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतकरी जो पिकवेल त्याबाबत करार होईल.
पण शेतजमीन जाणार अशी अफवा पसरविली जात आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे नमुन केले होते त्यापैकी शेतकरी हिताचे असलेले विषय केंद्रातील मोदी सरकार मार्गी लावत आहे. पण या विधेयकांना काँग्रेसही विरोध करीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे, अविनाश देव, माधव चंदनखेडे, पवन परियाल, राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.