*सावली वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार की मृत्यू ?*
विशेष प्रतिनिधि
सावली:- सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील लोंढोली परिसरातील नागरिकांना सकाळीच गावालगतच्या जंगलामध्ये बिबट हा मृत्यावस्थेत दिसून आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती वनरक्षक चौधरी साहेब यांना देण्यात आली. तसेच सदर बिबट्याचा मृत्यू आपोआप झाला की हत्या करण्यात आली याविषयी परिसरात संभ्रम निर्माण झाल्याची माहिती पुढे येत आहे. या मृत्यू पावलेल्या बिबट्याला ठार केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, मरण पावलेल्या बिबट्याच्या आजू- बाजूला रक्त ही पडलेले आहे. या बिबट ला काही गंभीर दुखापत आहे. चमू घटना स्थळा कडे रवाना झालेली आहे. या संदर्भात वनविभागाची चमू तपास करणार आहे. आता जो बिबट मृत्यू पावला त्याच परिसरात गेल्या काही महिन्या अगोदर सुध्दा बिबट जाळी मध्ये अटकून मृत्यूमुखी पाडला होता. याच परिसरात मोठ्या प्रमाणात शिकारी चे प्रकरण ही समोर आलेले असून, काही जणांना अटकही करण्यात आलेली होती.