*महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम*
*कोरोनावर मात करण्यासाठी आर्सिनिक अल्बम-30 चे वाटप*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
नरखेड :येथील मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी व युवा कार्यकर्ता शेखर ज्ञानेश्वराव राऊत यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. सामान्यता आधुनिक युवक वाढदिवसानिमित्त मौजमजा, सहल,विवीध प्रकारच्या पार्ट्या साजऱ्या करून नको तो खर्च करणे पसंत करतात .त्यामुळे अघटित घटना सुध्दा घडलेल्या आहेत. परंतु मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे महाविद्यालयात एम एस डब्ल्यू अंतिम वर्षांत शिकत असलेल्या शेखर ज्ञानेश्वराव राऊत रा पिंपळगाव(राऊत) यांनी या सर्व प्रकाराला फाटा देत देशपातळीवर कोरोना संसर्ग पाहता व ग्रामीण भागात या रोगाने पसरलेले पाय त्यावरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला आळा देत त्याच पैशातून आर्सिनिक अल्बम च्या गोळ्या खरेदी केल्या. सकाळी मिञमंडळीना घेवून प्रत्येक नागरिकाची कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरोघरी जाऊन अरसेनिक अल्बम -30 या गोळ्याचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च सामाजिक कार्यासाठी उपयोगी आणला. त्यामुळे शेखरच्या कार्याची वाढदिवसाच्या शुभेच्छासह सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे, शेखरच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील युवकांनी आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो या याचे भान ठेवणे गरजेचे आहे.त्याला या कार्यात डॉ अमोल कोहळे व डाँ आसावरी कोहळे वरुड, यांचे विशेष सहकार्य लाभले. गोळ्याचे गावातील नागरिकांना वाटप करण्यासाठी संदीप राऊत, उमेश ठाकरे, मोहन राऊत ,पवन झोड, अनुराग वासाडे ,परेश ताथोडे , दीपक राऊत ,विजय चौधरी, पंकज निंबुरकर ,हर्षल राऊत, प्रफुल सुरजुसे ,रोनित राऊत व मित्रपरिवार सहकार्य केले.