*सावनेर मध्ये कोरोना नी घेतला अजुन एक बळी*
*सावनेर शहरात मु्तकांची संख्या 14*
सावनेर प्रतिनिधी – सुरज सेलकर
*सावनेर ः शहरातील नगर परिषद हायस्कूल येथील सीपाई पदावर कार्यरत कैलास अवझे वय 52 यांचे “कोरोना” विषाणूंची लागन झाल्याने मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे आज दि. 4 आँक्टोबर रोजी सायंकाळी चार च्या दरम्यान मु्त्यू झाल्याचे निष्पन्नास आले*
*मन मिळावू स्वभावाचे कैलास अवझे यांना युवा अवस्थे पासुनच समाजकार्याची आवड़ असून ते नगर परिषद शाळेत शिपाई पदावर कार्यरत असुन होमगार्ड मधेही ते कार्यरत होते.दि.30 सप्टेंबर ला त्यांना कोरोना विषाणूंची लागन झाल्याचे निष्पन्नास आले असुन त्यांचे शरीरात आँक्सीजन ची कमतरता व त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांना तात्काळ मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे रवाना करण्यात आले होते.आज सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी शहरवासी व आप्त परिवारास कळताच एकच हळहळ व्यक्त केल्या जात आहे*
*कोरोना विषाणूंची लागन व संसर्ग झपाट्याने वाढत असुन केन्द्र व राज्य प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र असुन दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लाक्षणिक वाढ होत आहे.अश्यात महाराष्ट्र न्युज मीडिया च्या वतीने शहरवासीयांनि निवेदन करण्यात येते.घरीच रहा,अतिआवश्यक असल्यासच घरा बाहेर पडा़,सुरक्षित अंतर ठेवा व शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करा*