*महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या नावावर अरोलीत ग्रापंचायत सदस्याचा राजकीय खेळ*
*फुकट्या प्रसिद्दीं साठी लोकांना 5000रुपये मिळवून देण्याचे आमिष*
*महामंडळाचा कुठलाही फतवा नसताना परस्पर दिली गावात दवंडी*
*रिनिवल आणि पैशे मिळवून देण्याचा नावावर लोकांची आर्थिक लूट*
*आनलाईन फॉर्म भरण्या करीता महाऑनलाईन संचालकांची नेमणूक फक्त त्याच ठिकाणी फॉर्म भरण्याचे आग्रह*
*अरोली ग्रामपंचायत म्हणते दवनडी आणि लाभार्त्याची यादी तयार करण्याचा आमचा कसलाही समबंध नाही,*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
आरोली – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने 21 प्रकारचे कामे करणारे , त्यात बांधकाम मजूर, इतर बांधकाम कामगार जसे सुतार , वेल्डिंग वर्क ,काच काम, विटा कवेलू तयार करणारे असंगठित मजूर यांच्या उत्थान आणि कल्याणा करिता या महामंडळ्याची स्थापना झाली असून , त्या द्वारे या कामगरांकरिता आणि त्यांच्या पाल्या न करिता 21 प्रकारच्या विविध आर्थिक , सामाजिक, आणि आरोग्य विषयक योजना राबविल्या जाते, नेमके हेच हेरून आणि ग्रामीण कामगारांचे अज्ञान बघून या लोकांचा योजने वर आता नागपूर जिल्यात विविध राजकीय नेत्यांनी डोळा ठेवल्याचे दिसून येत असून , जे लाभार्थी नाही असे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आप्तस्वकीय यांना लाभ भेटावं म्हणून आणि आपली राजकीय पोळी शेकता यावी म्हणून बोगस कामगार नोंदणी केली असून आता गावा गावात या महामंडळाची अधिकृत परवानगी न घेता जाहीर दवनडी देऊन काही महाभाग 5000रुपये मिळवून देण्याचे आणि रिनिवल करून देण्याचे आमिष दाखवून लोकांन कडून कागदपत्रे जमा करून राजकीय हेतू साध्य करीत असून मात्र या राजकीय खेळीत सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.
सविस्तर असे की मौदा तहसील अंतर्गत च्या अरोली येथे असाच विचित्र प्रकार हा एका मोठ्या नेत्याचा छत्र छायेत सुरू असून या द्वारे लोकांची दिशाभूल करून फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे.आणि ही फसवून चक्क अरोली ग्राम पंचायत चा एक ग्रामपंचायत सदस्य करीत आहे.
त्याचे झाले असे की या महामंडळात या परिसरातील अनेक मजुरांची नोंदणी आहे, आता अनेक बनावट मजुरांची नोंद झाली असल्याने या विभागातील ऑफलाईन सभासद नोंदणी आणि रिनिवल प्रक्रिया ही बंद करून ऑनलाईन पद्धतिने सुरू करण्यात आली आहे, आता या विषयी ची कुन कुन या भामट्याला लागल्या मूळे या वेक्तींनी येणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीत आपल्याला या योजने वरून मताचे कॅश करता येईल म्हणून शक्कल लढवली आणि आपल्या नेत्यांसोबत महामंढलं चे ऑफिस गाठत संबधित विभागावर धावा बोलला असल्याचे शोषल मीडिया वर चित्र निर्माण केले , आता मग काय त्याच गोष्टी चा फायदा घेऊन यांनी महामंडळाची किंवा ग्रामपंचायती ची कसलीही परवानगी न घेता 5000 रुपये मिळवून देतो तुम्ही कागद पत्रे सादर करा अशी दवनडी पिटवली.
लगेच काही दिवसात परत तुमचे पिवळे पुस्तक रिनिवल करून देतो कागद पत्रे जमा करा अशी दवनडी दिली,आता यातच खरा गोडबंगाल आहे, महामंडळ म्हणत आहे की ऑनलाईन नोंदणी आणि रिनिवल करा तर इकडे ग्रामपंचायत चे सदस्य गावभर दवनडी पिटवून लोकांना सांगत सुटले की मी रिनिवल करून देतो आणि 5000 मिळवून देतो तुम्ही माझा कडे कागदपत्रे द्या , यात नेमके तुमचे राजकीय सोंग असल्याने तुम्ही लोकांना वेठीस धरून कागद पत्रे ध्या म्हणत आहात जे की ऑनलाईन प्रकिये द्वारे पूर्ण करायचे आहे आणि महा मंडळा ची असली कुठलीही 5000 रुपये देण्याची योजना नाही तरी तुम्ही दवनडी देऊन लोकांचा याद्या तयार करत आहात तेही फक्त राजकीय स्वार्था पोटी.
*भाऊंनी ऑनलाईन साठी नियुक्त केला सेतू संचालक*
भाऊंच्या या खेळीची इकडे गावात चर्चा सुरू झाल्यावर भाऊंनी आता लिस्ट तयार केलेल्या लोकांना गावातील एका सेतू संचालका कडे 100 रुपये प्रमाणे प्रति वेक्ती घेऊन ऑनलाईन प्रक्रिया करायला लावले, आणि पुन्हा त्या ऑनलाईन च्या पावत्या जमा करण्याचे सोंग घेतले.
*नेमकी काय आहे ऑनलाईन ची प्रक्रिया*
महामंडळात ऑनलाईन नोंदणी किंवा रिनिवल करण्या करिता कसलेही शुल्क लागत नाही, महा मंडळाच्या https://mahabocw. in या वेब साईट वर जाऊन नवीन नोंदणी किंवा रिनिवल करता येते अगदी मोबाईल द्वारे पण नोंदणी आणि कागद पत्रे अपलोड करू शकतो, नंतर फॉर्म सबमिट केल्याच्या एक विशिष्ट नो प्राप्त होतो आणि त्या नंतर या विभागा मार्फत सदर फॉर्म ची पळताळणी करण्या करिता देय तारखेला महामंडळात बोलावल्या जाते.
*अरोली ग्रामपंचायत ने ठेवले कानावर हात*
या विषयी अरोली ग्राम पंचायत चे सरपंच संदीप मलधाम यांना विचारणा केली असता संमधीत यादी आणि दवनडी सोबत ग्राम पंचायत अरोली यांचा कसलाही संबंध नसून ती संमधीत ग्रामपंच्यात सदस्याने दिल्या ची कबुली दिली.