*तोतलाडोह जलाशयातील अवैद्य मासेमारी रोखण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज*
*वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांची माहिती*
देवलापार प्रतिनिधि – पुरुषोत्तम डडमल
देवलापार- पेंच व्याघ्र प्रकल्प पिपरिया अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह जलाशयातील होणारी अवैद्य मासेमारी विरोधात विशेष मोहीम राबविण्या करीता वन विभागाची यंत्रना सज्ज असल्याची माहिती पुर्व पेंच पिपरियाचे वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी दिली.
दरवर्षी वन्यजीव सप्ताह निमित्य येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात येते.परंतू या वर्षी कोरोना महामारीमुळे वन्य जीव सप्ताह चे आयोजन व्यापक प्रमाणात करता आले नाही. तरीही स्थानिक पत्रकारांना अवैध मासेमारी बाबत माहिती देण्याकरिता कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या सूचनांचे पालक करून वन विभागाद्वारे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून वनविभाग तोतलाडोह जलाशयातील अवैध मासेमारी विरुद्ध अभियान राबवनू कोर एरियातील प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैद्य मासेमारीवर नियंत्रण आणून अवैद्य मासेमारी करणाऱ्यांचे मनसुबे वन विभागाने हाणून पाडले आहे.या अवैद्य मासेमारी व्यवसायातून वर्षाकाठी २०० कोटी पेक्षा अधिक रुपयाची उलाढाल व्हायची. त्यामुळे चोरट्या मार्गाने मासेमारी मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु मागील तीन ते चार वर्षापासून वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईचे परिणाम म्हणजेच अवैध मासेमारीला रोखथांब करण्यात यश आले आहे.
परंतु यावर्षी तोतलाडोह जलाशय गेल्या वर्षीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात तुडुंब भरल्याने धरणाचा जलसाठा वाढल्यामुळे अवैद्य मासेमारी होण्याची दाट शक्यता असल्यामुळेच अवैद्य मासेमारीचेेेे प्रमाण वाढू नये याची खबरदारी म्हणून वनविभागाने सहा बोटी,९८ विशेष व्याघ्र संरक्षक दलाचे जवान व स्थानिक वनरक्षक तसेच विशेष राखीव दलाच्या जवानांची अतिरिक्त कुमकही वनविभागाच्या मदतीला येणार आहे.ते रात्रंदिवस बोट, पायी,व वाहन गस्त करून अवैद्य मासेमारीवर लक्ष ठेवून आहेत.त्या करीता सेडल डँम,तुमडी मट्टा,भिवसेन कुटी, पिवर थडी येथे हे संरक्षण दलाचे कॅम्प सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
याशिवाय मासेमाऱ्याच्या ज्या दिशेन आक्रमण होते ते, बोधलझिरा, सारख्या काही भागात राज्य राखीव दलाचे जवान चोविस तास तैनात राहणार आहे. त्यासाठी सहा पेट्रोल बोटीसह १ श्वानही पथक ही तैनात राहणार आहे. त्यासाठी एका श्वानाची व त्यासाठी एका प्रशिक्षीत प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.असे वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी सांगितले.
मंगेश ताटे वनपरिक्षेत्र अधिकारी,पूर्व पेंच, पिपरिया. तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे ए सी एफ महेश परब व स्थानिक वृत्त प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.