*मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या पुढाकाराने धरणे*
*जनकल्याण बहुद्देशीय संघटना,जय शिवाजी सामाजिक संघटना,आम आदमी पार्टी, व अन्य सामाजिक संघटनेचा सहभाग*
सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर
सावनेर – येथील गांधी चौकात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या नेतृत्वात जनकल्याण बहुद्देशीय संघटना,जय शिवाजी समाजीक संघटना तसेच अन्य संघटनेनी घरने आंदोलन करुण हाथरस बलात्कार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा व उ.प्र. सरकार बरखास्त करा,केंद्र शासनाने पारित केलेला शेतकरी विरोधी काळा कृषी कायदा त्वरित रद्द करा, केंद्र शासनाने आणलेले नवीन कामगार विधेयक रद्द करा, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्राचे केलेले खाजगीकरण रद्द करा,देवजीभाई माहेश्वरी हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करा, कोरडी महादुल्ला येथे 6 वर्षाचा मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा करा इत्यादी मुद्द्यावर धरणे प्रदर्शन करण्यात आले*
*त्यानंतर मा.तहसीलदार सावनेर यांचा मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना भगवान चांदेकर जनकल्याण बहुद्देशीय संघटना अध्यक्ष,दिनेश इंगोले विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ,पवन लांबट संभाजी ब्रिगेड सावनेर तालुका अध्यक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आ ले .त्यावेळी भगवान चांदेकर ,दिनेश इंगोले,सेवकराम राऊत,मोहन निकाजू,पवन लांबट,गणपती पठाणे, सचिन लिडर,कपिल ढंवगाळे,कांचन ढंवगाळे,विनोद मानकर,छञपाल निकोसे, अजय वाल्मिकी,महेश वाघमारे,विक्रम गमे ,बलराम चोरे आदी उपस्थित होते*